Solapur crime: ज्याला विकला फोन, त्यानेच केला घोळ! दोघा चोरट्यांना 50 मोबाईलसह सोलापुरात अटक

| Updated on: Aug 20, 2022 | 10:57 AM

Solapur Mobile Theft : जवळपास 4 लाख रुपयांये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन या चोरट्यांकडे आढळून आले आहेत. सध्या अटक करण्यात आलेल्या दोघांची चोरांची सोलापूर पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Solapur crime: ज्याला विकला फोन, त्यानेच केला घोळ! दोघा चोरट्यांना 50 मोबाईलसह सोलापुरात अटक
जप्त केलेले फोन...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सोलापूर : दोघा सराईत मोबाईल चोरट्यांना पोलिसांनी अटक (Solapur Mobile Theft Arrested) केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर पोलिसांनी (Solapur Police News) केलेल्या कारवाईत यावेळी 50 चोरीचे फोनही जप्त करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबतची माहिती दिली आहे. याप्रकरणी चेतन गौड आणि युवराज कदम या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चोरीचा मोबाईल ज्या व्यक्तीला विकण्यात आला होता, त्याच व्यक्तीचा धागा पकडून पंढरपूर पोलिसांनी तपास केला आणि अखेर मोबाईलची चोरी करणाऱ्या भामट्यांना अटक (Solapur crime News) केली आहे. जवळपास चार लाख रुपयांये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन या चोरट्यांकडे आढळून आले आहेत. सध्या अटक करण्यात आलेल्या दोघांची चोरांची पंढरपूर पोलीस कसून चौकशी करत आहेत.

50 फोनसह चोरटे गजाआड

चोरीचा मोबाईल विकत घेतलेल्या व्यक्तीच्या धागा पकडून पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दोघा अट्टल मोबाईल चोरट्यांना बेड्या टाकल्या. त्यांच्याकडून तब्बल तीन लाख 90 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे चोरीचे एकूण 50 मोबाईल हस्तगत केले. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली असून चेतन गौड व युवराज कदम अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

चोरांना पकडलं कसं?

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सायबर शाखेकडून तांत्रिक विश्लेषण घेतले होते. त्यानुसार चोरीस गेलेल्या सॅमसंग कंपनीच्या मोबाईल वाडेगाव येथील एक व्यक्ती त्याचे सिम कार्ड टाकून वापरत असल्याचं समोर आले. त्याने हा मोबाईल एक महिन्यापूर्वी एका इसमाकडून विकत घेतला होता, असं सांगितले.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पारे येथील चेतन गौड व गिरझणी येथील युवराज कदम या दोघांना मोठ्या शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली असता ते मोबाईल चोरीतील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी विविध ठिकाणी चोरलेले वेगवेगळ्या कंपनीचे 50 मोबाईल पंढरपूर पोलिसांनी हस्तगत केले असल्याचं पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले.