नवरा-बायकोच्यामध्ये झोपायची सासू, नवरा संबंध ठेवण्यास द्यायचा नकार, कारण ऐकून बायको हादरली
सुहागरातच्या दिवशी नवऱ्याने दोघांच्यामध्ये ठेवली उशी. पत्नीसोबत संबंध ठेवण्यासाठी शेवटपर्यंत करत राहिला नकार. मात्र, जेव्हा पत्नीला कारण समजलं तेव्हा तिची उडाली झोप.

Crime News : देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील कानपूर येथे फसवणुकीच्या लग्नाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. पतीने स्वतःच्या दोन्ही किडन्या निकामी असल्याची माहिती लपवून तिच्याशी विवाह केल्याचा आरोप महिलेने केला आहे. एवढेच नाही तर लग्नानंतर पतीने शारीरिक संबंध टाळत तिच्याकडून किडनी किंवा उपचारासाठी तब्बल 30 लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
नवरा-बायकोच्यामध्ये झोपायची सासू
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या चकेरी भागातील पीडित महिलेचा विवाह 22 जून 2023 रोजी लखनऊ येथील निशांत कुमार याच्याशी झाला होता. लग्नानंतर पतीने आरोग्याच्या कारणावरून पत्नीपासून अंतर ठेवले. तो झोपतानामध्ये उशी ठेवत असे तर काही वेळा सासूही दोघांच्या मध्ये झोपत असल्याचे महिलेने सांगितले. या वर्तनामुळे संशय वाढल्यानंतर महिलेने चौकशी सुरू केली.
काही महिन्यांनंतर महिलेच्या हाती पतीची वैद्यकीय फाईल लागली. त्यामध्ये पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे आणि तो डायलिसिसवर असल्याचे उघड झाले. ही बाब समोर आल्यानंतर पत्नीने जाब विचारला असता, पतीने निर्लज्जपणे तिच्याकडून किडनी दान करण्याची मागणी केली किंवा तिच्या माहेरून 30 लाख रुपये आणण्याचा दबाव टाकला.
फसवणूक आणि हुंडाबळी प्रकरणी गुन्हा दाखल
याशिवाय, पती आधीपासूनच विवाहित असून त्याला बनारसमध्ये पत्नी आणि मुलगी असल्याचाही आरोप महिलेने केला आहे. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने चकेरी पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध फसवणूक आणि हुंडाबळी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी सुरुवातीला समेटाचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. एसीपी अभिषेक पांडे यांच्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीवरून गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे समाजात मोठी खळबळ उडाली आहे.