Mumbai | कुर्बानीचा वाद मीरा रोडवरून थेट घाटकोपरच्या सागर सोसायटीत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मुंबईतील मीरा रोड परिसरात बकरा कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर आता घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीतही तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. या सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बकरा कुर्बानीची परंपरा सुरू असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. मात्र यावर्षी मुंबई महानगरपालिकेने अचानक परवानगी रद्द केल्याने वाद निर्माण झाला आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, “आम्ही सोसायटीच्या आवारात कुर्बानी करणार नाही. महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, आम्ही तिथे धार्मिक विधी पार पाडू. आम्हाला सोसायटीचं नाव खराब करायचं नाही,” अशी भूमिका काही नागरिकांनी घेतली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीही सागर पार्क सोसायटीत दाखल झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या ठिकाणी भेट देण्याची घोषणा केली असून त्याआधीच परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्बानीसाठी आणलेल्या 31 बोकडांपैकी 23 बोकड मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतले आहेत. यापुढे सोसायटी परिसरात कुर्बानी होऊ दिली जाणार नसल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. “महापालिका पर्यायी जागा उपलब्ध करून देत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणं महत्त्वाचं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या संपूर्ण प्रकरणामुळे घाटकोपर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पोलिस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Published on: May 27, 2026 01:28 PM
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा