गोहत्येचा संशय, सिनेस्टाईल पाठलाग करत टेम्पोवर कारवाई, सापळा रचून दोघांना पकडलं!

| Updated on: Dec 25, 2021 | 10:20 PM

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारं पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग केला. यानंतर सापळा रचून पोलिसांनी टेम्पोसह दोघांना ताब्यात घेतलं आहे. मोठ्या शिताफीनं पोलिसांनी हा सापळा रचला होता.

गोहत्येचा संशय, सिनेस्टाईल पाठलाग करत टेम्पोवर कारवाई, सापळा रचून दोघांना पकडलं!
कारवाईत पकडलेला टेम्पो
Follow us on

अहमदनगर : अहमदनगरमध्ये पोलिसांनी (Police) मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांची कत्तल होण्यासाठी रोखलंय. याप्रकरणी पोलिसांनी एक टेम्पोवर धडक कारवाई केली असून दोघांना ताब्यात घेतलंय. या कारवाईमध्ये 3.14 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय 7 गोवंशीय जनावरांची सुखरुप सुटकाही केली आहे.

सिनेस्टाईल पाठलाग

अहमदनगरच्या कोठी चौक स्टेशन रोडमधून एक टेम्पो गोवंशीय जनावरांना घेऊन निघाला होता. या टेम्पोलीत जनावरांची कत्तल केली जाण्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारं पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग केला. यानंतर सापळा रचून पोलिसांनी टेम्पोसह दोघांना ताब्यात घेतलं आहे. मोठ्या शिताफीनं पोलिसांनी हा सापळा रचला होता. त्यानंतर सिनेस्टाईल पाठलागही या टेम्पोचा करण्यात आला. यानंतर पोलिसांनी जनावरांना घेऊन जाणारी गाडी अडवून ही कारवाई केली आहे.

7 जनावरांची सुटका

यावेळी पोलिसांनी टेम्पोचा सिनेस्टाईल पाठलाग करत दोन आरोपींना ताब्यात घेतलंय. त्यासोबत एकूण 3 लाख 41 हजार रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची कसून चौकशी केली जाते आहे.

नेमकं या जनावरांना कुठून आणण्यात आलं होतं, त्यांना कुठं नेलं हात होतं आणि कत्तलीच्या उद्देशानं टेम्पोतून केल्या जाणाऱ्या या वाहतुकीच्या मागे नेमका कुणाचा हात होता, याचा पोलिस आता शोध घेत आहेत.

पाहा स्पेशल रिपोर्ट –

इतर बातम्या –

VIDEO : पोलीस चौकीबाहेरच लष्करी जवानाला मारहाण; अंबरनाथमध्ये टोळक्याची दादागिरी

Dombivali Crime: चाकूच्या धाकाने बँक मॅनेजरला लूटले; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

Buldana | आईच्या कुशीत झोपलेल्या 13 वर्षांच्या मुलाला वडिलांनी संपवलं, कारण…