
नाशिक : नाशिकमध्ये एका भामट्याने केलेली चोरी (Nashik Crime News) चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबई नाका पोलिस (Mumbai Naka Police) ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर ही धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. ट्रायलच्या नावाखाली ॲक्टिवा मोपेड दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. श्रेयस संजय बोथरा यांनी याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी 19 तारखेला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बोथरा यांच्या फोनवर अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला होता. त्यात त्याने म्हंटले होते की मी समीर मोतीवाला बोलत आहे, मला तुमची ॲक्टिवा विकत घ्यायची आहे. ३० हजार रुपये मी द्यायला तयार आहे. त्यानंतर बोथरा यांच्या घरी समीर मोतिवाला नामक व्यक्ति आला आणि ट्रायल घेऊ का ? असा सवाल विचारला. त्यानंतर बोथरा यांनी ट्रायल देण्यासाठी होकार दिला. समीर ट्रायल घेण्यासाठी ॲक्टिवा घेऊन गेला तसा आजवर परत आला नाही.
मुंबई नाका गायकवाड नगर परिसरातील जैन कॉलनी येथे राहणाऱ्या श्रेयस यांची ट्रायलच्या नावाखाली ॲक्टिवा चोरी केली आहे.
श्रेयस याने 30 हजार रुपयांना फोनवर व्यवहार केला होता, त्यावेळी समीर मोतिवाला नामक व्यक्तीने गाडी घ्यायला तयार असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर श्रेयस यांच्या घरी येऊन समीर याने ट्रायल घेतो म्हणून घेऊन गेला तसा आजपर्यंत समीर गाडी घेऊन परत आला नाही.
त्याने कॉल केलेल्या नंबरवर समीर ने अनेकदा कॉल, मेसेज केले मात्र अद्यापही गाडी मिळू शकलेली नाही.
खरंतर श्रेयस आणि विश्वास ठेऊन ट्रायलला गाडी दिल्याने त्यांची फसवणूक झाली आहे, त्यातच संबंधित व्यक्तीचा संपर्कही होत नसल्याने श्रेयसला पोलिसांत धाव घ्यावी लागली आहे.
अलीकडेच्या काळात चोरी करण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी भामटे नवनवीन युक्त्या लावत आहे, त्यामुळे व्यवहार करत असतांना आपली आर्थिक फसवणूक होणार नाही याची चार वेळेस खात्री करून घ्या.