वर्धा नदीत आंघोळ करायला गेला मुलगा, बुडताना पाहून आई धावली! मुलासह आईचा बुडून मृत्यू

वर्धा नदीत मुलगा आंघोळ करायला गेला. तो खोल पाण्यात जाताना पाहून मदतीसाठी त्याची आई धावली. पण, तीही त्याच्यासोबत खोल पाण्यात बुडाली. दोघांचेही मृतदेह काढण्यात आले आहेत.

वर्धा नदीत आंघोळ करायला गेला मुलगा, बुडताना पाहून आई धावली! मुलासह आईचा बुडून मृत्यू
वर्धा नदीच्या पात्रात बुडून मायलेकाचा मृत्यू झाला.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 3:19 PM

चंद्रपूर : महाशिवरात्रीला (Mahashivaratri) वर्धा नदी पात्रात (Wardha River Ghat) आंघोळ करायला गेलेल्या आई-मुलाचा मृत्यू झाला. गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर-लोणवलीच्या वर्धा नदी घाटावर ही घटना घडली. आंघोळीला गेलेला मुलगा खोल पाण्यात बुडू लागला. मुलाला वाचविण्यासाठी आई धावून गेली. मुलाला वाचविताना आईचाही दुदैवी मृत्यू झाला. पदमा अरकोंडा, व रक्षित अरकोंडा अशी मृतकांची नावे आहेत. दोघेही तेलंगणातील लोणवाही (Lonavah in Telangana) येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर माय-लेकांचा मृतदेह बाहेर काढला.

मुलाला वाचविण्यासाठी धावली आई

महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त भाविक ठिकठिकाणी भेट देत आहेत. विशेषत: शिवमंदिरांना भेटी देत आहेत. ही शिवमंदिरं पहाडावर किंवा काही नदीकिनारी आहेत. वर्धा नदी पात्रात आंघोळ करायला गेलेला मुलगा खोल पाण्यात गेल्याने बुडू लागला. मुलाला वाचविण्यासाठी आई धावून गेली. मुलाला वाचविताना आईचा ही दुदैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारला सकमूर-लोणवली घाटावर घडली.

बऱ्याच प्रयत्नानंतर मायलेकाचा मृतदेह काढला

तेलंगणा राज्यात येणाऱ्या लोणवाही येथील पदमा अरकोंडा, रक्षित अरकोंडा हे दोघे माय-लेक महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला गेले. तिथं वर्धा नदी पात्रात आंघोळीला गेले. गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर-लोणवाही घाटावर मुलगा आंघोळ करीत असताना खोल पाण्यात गेला. मुलाला वाचविण्यासाठी आई धावून गेली. मात्र यात माय-लेकाचा दुदैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. बऱ्याच प्रयत्नानंतर माय-लेकांचा मृतदेह काढण्यात आला.

खारकीवमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल! अमरावतीतील आई-वडील चिंतेत

Nagpur Crime | भरदिवसा कार्यालयात काढली तलवार! तीन लाख घेऊन आरोपी पळाले, नागपुरात नेमकं काय घडलं?

Chandrapur : जास्त मूल्यांकन करून कर्जवाटप, स्टेट बँकेतील तीन अधिकाऱ्यांना अटक, आणखी कुणाकुणावर कारवाई?