गोदापार्क मधील दारू पार्टी प्रकरणात बेपत्ता युवकाचा मृत्यू झाल्याचे उघड, पोलीसही चक्रावले

| Updated on: Nov 17, 2022 | 1:40 PM

बहुचर्चित गोदापार्क दारू पार्टी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, तब्बल आठ दिवसांनी दारू पार्टीनंतर बेपत्ता झालेला युवक दीपक दिवे याचा मृतदेह आढळून आला आहे.

गोदापार्क मधील दारू पार्टी प्रकरणात बेपत्ता युवकाचा मृत्यू झाल्याचे उघड, पोलीसही चक्रावले
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : तब्बल आठ दिवस उलटून गेल्यावर पोलिसांऐवजी नातेवाईकांना बेपत्ता दीपक दिवेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चौघा मित्रांसोबत दारू पार्टी करण्यासाठी गोदापार्क परिसरात गेलेला युवक दीपक गोपीनाथ हा घरी परतलाच नव्हता. या युवकाचा गंगापूर पोलीस तसेच नातेवाईक कसून शोध घेत होते. काल त्याचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात तरंगताना नातेवाईकांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. दिपकच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र त्याच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान दीपक दिवे बेपत्ता झाल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीवरुण गंगापूर पोलीसांच्या पथकाने मित्रांची कसून चौकशी सुरू केली होती. त्यातच तब्बल आठ दिवसांनी दिवेचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

बहुचर्चित गोदापार्क दारू पार्टी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, तब्बल आठ दिवसांनी दारू पार्टीनंतर बेपत्ता झालेला युवक दीपक दिवे याचा मृतदेह आढळून आला आहे.

दीपक दिवे याच्यासोबत दारू पार्टीत असलेल्या विजय जाधवने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती, त्यात पोलीसांच्या मारहाणीमुळे त्याने आत्महत्या केली आहे असा आरोप जाधवच्या नातेवाइकांनी केला होता.

हे सुद्धा वाचा

दीपक दिवेच्या बेपत्ता प्रकरणी गंगापूर पोलीसांनी तपासाच्या कामी दिवेच्या मित्रांची चौकशी सुरू केली होती, त्यातच एकाने आत्महत्या केल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती.

दरम्यान या प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडून चौकशी सुरू असली तरी दुसरीकडे दिवेचा मृतदेह आणि जाधवची आत्महत्या यावरून घातपाताचा संशय बळावला आहे.

त्यामुळे नाशिकमधील बहुचर्चित गोदापार्क मधील दारू पार्टी प्रकरण आता कोणत्या वळणाला जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.