पत्नीला थाप मारून अभियंत्याचे प्रेयसीला घेऊन जीवाचे मालदीव, ‘या’ कारणामुळे थेट तुरूगांत रवानगी, वाचा नेमके काय घडले!

| Updated on: Jul 10, 2022 | 10:23 AM

अभियंता कामानिमित्त परदेशात जाण्यासाठी पत्नीला सांगून निघाला होता. मात्र, गेला तिसरीकडेच. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा आला तेव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्याचा पासपोर्ट तपासला. मात्र, पासपोर्टमध्ये 3 ते 6 आणि 31 ते 34 पाने गायब असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

पत्नीला थाप मारून अभियंत्याचे प्रेयसीला घेऊन जीवाचे मालदीव, या कारणामुळे थेट तुरूगांत रवानगी, वाचा नेमके काय घडले!
Image Credit source: sita.aero
Follow us on

मुंबई : विवाहबाह्य प्रेमप्रकरण लपवण्यासाठी कोण कधी काय करेल याचा नेम नाहीयं. एका अभियंत्याने (Engineer) तर विवाहबाह्य प्रेमप्रकरण लपवण्यासाठी खतरनाक युक्ती लढवली. मात्र, त्यानंतर त्याची थेट रवानगी तुरूंगात  झाली. अभियंता आपल्या पत्नीला चोरून प्रेयसीसोबत मालदीवला (Maldives) गेला. प्रेयसीसोबत मस्त मालदीव ट्रीप एन्जाॅय देखील केली. परंतू आपल्या पत्नीला मालदीव ट्रीपबद्दल (Trip) काही कळू नये, याकरिता पट्ट्याने असे काही केले की, त्याला विमानतळावरून थेट तुरूंगात वेळ आली.

पत्नीला चोरून अभियंता प्रेयसीला घेऊन गेला मालदीवला

अभियंत्याने आपल्या पत्नीला सांगितले की, आॅफिशियल कामानिमित्त परदेशात जात आहे. मात्र, तो प्रेयसीसोबत मालदीव ट्रीपवर गेला आणि तिकडे एन्जाॅय करत परत वापस भारतामध्ये देखील आला. मात्र, मालदीव ट्रीपचे गुपीत पत्नीला समजू नये म्हणून चक्क पासपोर्टमधील मालदीव व्हिसाचा शिक्का असलेली पाने फाडून टाकल्याने त्याला आता तुरुंगात जावे लागले आहे. पत्नीला मालदीव ट्रीपबद्दल समजणारच नाही, म्हणून तो निश्चित झाला. पण विमानतळावर आल्यावर त्याचे डोळेच पाण्यात पडले.

हे सुद्धा वाचा

मालदीव व्हिसाचा शिक्का असलेली पानेच फाडली

अभियंता कामानिमित्त परदेशात जाण्यासाठी पत्नीला सांगून निघाला होता. मात्र, गेला तिसरीकडेच. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा आला तेव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्याचा पासपोर्ट तपासला. मात्र, पासपोर्टमध्ये 3 ते 6 आणि 31 ते 34 पाने गायब असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यावर अधिकाऱ्यांनी अभियंताची चाैकशी केली असता त्याने यावर बोलण्यास टाळाटाळ केली. यानंतर अभियंत्याला पोलिसांनी ताब्यात घेत फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला.