Ambernath Youth Drowned : अंबरनाथच्या मलंगगड परिसरातील नदीत दोघे बुडाले, पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना

| Updated on: Jul 11, 2022 | 7:39 PM

मलंगगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंभे गावाजवळून वाहणाऱ्या नदीला मोठा प्रवाह आला आहे. आज डोंबिवलीहून 12 जणांचा एक ग्रुप या परिसरात पिकनिकसाठी आला होता.

Ambernath Youth Drowned : अंबरनाथच्या मलंगगड परिसरातील नदीत दोघे बुडाले, पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना
अंबरनाथच्या मलंगगड परिसरातील नदीत दोघे बुडाले
Image Credit source: TV9
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथच्या मलंगगड परिसरात दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. आंभे गावाजवळील नदीत पोहता (Swimming)ना पाण्याचा अंदाज न आल्यानं हे तरुण बुडाल्या (Drowned)ची घटना घडली. अंकित जयस्वाल आणि निखिल कनोजिया अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. डोंबिवलीतील 12 मित्र पिकनिकसाठी मलंगगड परिसरात आले होते. यावेळी पोहण्यासाठी नदीत उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीत बुडाले. स्थानिकांनी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर तहसीलदारांनी 31 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू केले असून त्यानंतरही हा ग्रुप या परिसरात कसा आला? त्यांना पोलिसांनी अडवलं कसं नाही? असा प्रश्न यानंतर निर्माण झालाय.

मनाई आदेश असताना पिकनिक आले होते तरुण

मलंगगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंभे गावाजवळून वाहणाऱ्या नदीला मोठा प्रवाह आला आहे. आज डोंबिवलीहून 12 जणांचा एक ग्रुप या परिसरात पिकनिकसाठी आला होता. यावेळी आंभे गावाजवळील नदीत हे तरुण पोहण्यासाठी उतरले. मात्र त्यांना नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने यापैकी अंकित जयस्वाल आणि निखिल कनोजिया हे दोन 17 वर्षीय तरुण नदीत बुडाले. यावेळी स्थानिकांनी तिथे धाव घेत या तरुणांचा शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह आढळून आले. मलंगगड परिसरात मागच्या वर्षी पावसाळ्यात नदीत बुडून 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. (The two youths drowned while swimming in a river in Malanggad area of Ambernath)

हे सुद्धा वाचा