Mahableshwar : चोरटे काय चोरतील याचा नेम नाही, घराच्या बांधकामाचं साहित्य पिकअपमधून चोरुन नेलं, मग पोलिसांनी…

चोरट्यांचा काही नेम नाही, काहीही चोरतात अशी चर्चा महाबळेश्वरमध्ये सध्या सुरु आहे. त्याचबरोबर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

Mahableshwar : चोरटे काय चोरतील याचा नेम नाही, घराच्या बांधकामाचं साहित्य पिकअपमधून चोरुन नेलं, मग पोलिसांनी...
Mahableshwar Police
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 21, 2023 | 3:24 PM

सातारा : महाबळेश्वर (Mahableshwar) येथे घराचे काम चालू असलेल्या बांधकामावरून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 29 हजार रुपये किमतीचे पॉलीकॅब वायर (Pollycab Wire) सह बांधकामाची निगडीत साहित्य चोरीला गेल्याची तक्रार महाबळेश्वर पोलिसांमध्ये (Police) दाखल झाली आहे. त्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेला देगाव फाटा येथून दोन युवक पिकअप जीपमधून चोरीचा माल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्या गाडीची तपासणी केल्यावर चोरी केलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन दोघांची चौकशी केली. यामध्ये दोघांनी गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली असून पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप जीप असा एकूण 5 लाख 66 हजार 580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोरट्यांचा काही नेम नाही, काहीही चोरतात अशी चर्चा महाबळेश्वरमध्ये सध्या सुरु आहे. त्याचबरोबर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परिसरात या आगोदर अशा पद्धतीच्या काही तक्रारी दाखल झाल्या आहेत याची सुध्दा पोलिस चौकशी करणार आहेत.