AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्सने लाँच केली नवी जर्सी, कर्णधार श्रेयस अय्यरचा लूक पाहा

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्सची जेतेपदाची झोळी रितीच राहिली आहे. आतापर्यंत 18 पर्वात दोनदा जेतेपदाने हुलकावणी घातली. आता पुन्हा एकदा पंजाब किंग्स संघ जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी पंजाब किंग्सने नव्या जर्सीचं अनावरण केलं आहे.

IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्सने लाँच केली नवी जर्सी, कर्णधार श्रेयस अय्यरचा लूक पाहा
IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्सने लाँच केली नवी जर्सी, कर्णधार श्रेयस अय्यरचा लूक पाहाImage Credit source: Punjab Kings Twitter
| Updated on: Mar 12, 2026 | 9:22 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्व दहा फ्रेंचायझी तयारीला लागल्या आहेत. यात पंजाब किंग्स संघही मागे नाही. मागच्या पर्वात जेतेपदाची संधी हुकली होती. आरसीबीने अंतिम सामन्यात पराभूत केल्याने पहिल्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. आता पुन्हा एकदा पंजाब किंग्स संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे. आयपीएल स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. यापूर्वी पंजाब किंग्स फ्रेंचायझीने या पर्वासाठी नव्या जर्सीचं अनावरण केलं आहे. फ्रेंचायझीने सोशल मीडियावर कर्णधार श्रेयस अय्यरचा नव्या जर्सीसह फोटो शेअर केले आहेत. तसेच संघाचा एक व्हिडीओही जारी केला आहे. ही जर्सी मागच्या पर्वातील जर्सीपेक्षा खूपच वेगळी आहे. मागच्या पर्वात पंजाब किंग्सची जर्सी पूर्णपणे लाल रंगात होती. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.

आयपीएल स्पर्धेतील पंजाब किंग्सने आपल्या लाल रंगाची ओळख कायम ठेवली आहे. पण नव्या जर्सीममध्ये लाल रंगासह गोल्डन डिझाईन दिली आहे. इतकंच काय तर खेळाडूंची नावंही सोनेरी रंगातच लिहिली आहेत. इतकंच काय तर खांद्यावर निळ्या रंगाच्या पट्ट्या दिल्या आहेत. त्यामुळे ही जर्सी वेगळी दिसते. या जर्सीत पांढरा आणि हलका पिवळ्या रंगाचा वापरही करण्यात आला आहे. पंजाब किंग्सची नवी जर्सी चाहत्यांना पसंतीस उतरली आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जारी

आयपीएल स्पर्धेसाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. या टप्प्यात पंजाब किंग्स चार सामने खेळणार आहे. पहिला सामना 31 मार्च रोजी गुजरात टायटन्सशी, दुसरा सामना 3 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सशी, तिसरा सामना 6 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी आणि चौथ्या सामना 11 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादशी खेळणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी पंजाबचा संपूर्ण संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, बेन ड्वारशुइस, विशाल निषाद, प्रवीण दुबे, अर्शदीप सिंह, अजमतुल्लाह उमरजई, हरनूर पन्नू, हरप्रीत बराड़, लॉकी फर्ग्यूसन, मार्को यानसेन, मार्कस स्टोइनिस, मिच ओवेन, मुशीर खान, नेहाल वढेरा, पायला अविनाश, शशांक सिंह, सूर्यांश शेडगे, विष्णु विनोद, विशाक विजयकुमार, झेव्हियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, यश ठाकुर.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल