AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monalisa Marriage : मोनालिसा लव्ह जिहादची शिकार? मुस्लीम बॉयफ्रेंडशी लग्न केल्याने दावा; नेमकं सत्य काय?

कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने लग्न केले आहे. तिचे लग्न हे लव्ह जिहादचे उदाहरण आहे, असा दावा केला जात होता. याबाबत आता खुद्द मोनालिसाने समोर येत प्रतिक्रिया दिली आहे.

Monalisa Marriage : मोनालिसा लव्ह जिहादची शिकार? मुस्लीम बॉयफ्रेंडशी लग्न केल्याने दावा; नेमकं सत्य काय?
Monalisa MarriageImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 12, 2026 | 9:08 PM
Share

Monalisa Marriage And Love Jihad : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या घाऱ्या डोळ्याच्या मोनालिसाने आता लग्न केले आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत केरळमध्ये जाऊन तिने विवाह केल आहे. लग्नावेळी ती अल्पवयीन असल्याचा दावा केला जात होता. परंतु त्यात तथ्य नसल्याचे मोनालिसा आणि तिच्या पतीकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या लग्नाला तिच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. म्हणूनच मोनालिसाने पोलीस संरक्षणात हा विवाह केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून ती फरमान नवाच्या मुलाच्या प्रेमात होती. दरम्यान, आता फरमान आणि मोनालिसाचे लग्न म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा दावा केला जात आहे. याबाबतही खुद्द मोनालिसाने समोर येऊन खुलासा केला आहे.

मोनालिसाने समोर येत दिले पुरावे

मोनालिसाने मंदिरात जाऊन लग्न केल्यानंतर तिच्या विवाहाबाबत वेगवेगळे दावे केले जात होते. तिचा बॉयफ्रेंड मुस्लीम असल्यामुळे तर वेगवेगळे दावे केले जात होते. मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली आहे, असा दावा तर अनेकजण करत होते. परंतु या सर्व चर्चा खोट्या असल्याचे मोनालिसानेच पुढे येऊन सांगितले आहे. लग्न झाल्यानंतर मोनालिसा आणि फरमान यांनी एकत्र येत लग्न केले. यावेळी त्यांनी मोनालिसाच्या वयाचा पुरावा सादर केला. तसेच लव्ह जिहादच्या आरोपावर बोलताना आम्ही हिंदू विवाह पद्धतीने लग्न केले आहे. फरमान माझ्याशील लग्न करण्यास तयार नव्हता. मीच लग्नासाठी त्याच्या मागे लागले होते, असे मोनालिसाने स्पष्ट केले.

आम्ही आमचा धर्म बदललेला नाही

तसेच, आमच्या विवाहात कुठेही लव्ह जिहाद नाही. मी मुस्लीम आहे. तर मोनालिसा अजूनही हिंदू आहे. आम्ही कुठेही एकमेकांचा धर्म बदललेला नाही. उलट आम्ही हिंदू विवाह पद्धतीने लग्न केलेले आहे. यापुढेही मोनालिसाला जे चांगले वाटेल तेच होईल. तिच्या इच्छेविरोधात मी जाणार नाही, असे फरमान याने स्पष्ट केले. प्रेमाला जात धर्म नसतो, हे सांगायलाही फरमान विसरला नाही.

लव्ह जिहादचा दावा खोटा

दरम्यान, मोनालिसा आणि फरमान यांनी समोर येत आम्ही स्वखुशीने लग्न केले आहे. आम्ही आमचा धर्म बदललेला नाही, असे सांगितल्याने आता लव्ह जिहादचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोनालिसाचा लवकरच एक चित्रपट आहे. फरमान हादेखील अभिनेता आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!