दुबईच्या या नकली ‘शेख’ची फॅशन भारी, एक लाखाचे बुट आणि बरेच काही

लीला पॅलेस हॉटेलचे बिल भरण्यासाठी त्याने हॉटेलला पोस्ट-डेटेड चेक दिले होते. परंतू ते वटले नाहीत. अबू धाबीच्या राजघराण्यातील सदस्य शेख फलाह बिन झायेद अल नाह्यान यांच्या कार्यालयात काम करतो असे सांगून त्याने हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला होता.

दुबईच्या या नकली शेखची फॅशन भारी, एक लाखाचे बुट आणि बरेच काही
dubaiconman
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jan 23, 2023 | 1:33 PM

दिल्ली :  आपल्या हायफाय राहणीमानाने रॉयल फॅमिलीचा सदस्य असल्याचे भासवत दिल्लीच्या पंचतांराकित हॉटेलचा फुकटात मुक्काम झोडणाऱ्या ठकास दिल्ली पोलीसांनी अखेर बंगळुरू येथून अटक केली आहे. त्याच्या उंच्च राहणीमानाला भुलून त्याला दिल्लीच्या लीला पॅलेस या हॉटेलात मुक्काम ठोकत फुकटचा पाहुणचार झोडला होता. त्याने आपले बुट एक लाख रूपयांचे असल्याचा दिल्ली पोलीसांकडे केला आहे. त्याच्या रहाणीमानाने पोलीस चक्रावून गेले आहेत.

दिल्ली पोलीसांनी बंगळूरू येथून या 41 वर्षीय मोहम्मद शरीफ नकली दुबई शेखला जेरबंद केले आहे. हा स्वताला दुबईच्या रॉयल फॅमिलीचा कर्मचारी असल्याचे सांगत दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलात गेल्यावर्षी एक ऑगस्ट ते 20 नोव्हेंबरपर्यंत बिनधास्त पाहूणचार झोडत होता. त्याने 23 ते 28 लाखांचे बिल केले होते. त्याच्या शोधासाठी अनेक टीम नेमल्या तेव्हा बंगळूरला दिल्ली पोलीसांना सापडला.

मोहम्मद शरीफ दुबईत शेख फॅमिलीकडे नोकरी केली होती. त्यामुळे लॅव्हीश रहाणीमानाची त्याला सवय लागली होती. भारतातही त्याने तसेच रहाणीमान तयार करण्यासाठी रूप धारण करीत अत्यंत उंची रहाणीमान राखले होते. पोलीसांना त्याने त्याचे बुट दाखवित ते एक लाख रूपयांचे असल्याचा दावा केला आहे.

लीला पॅलेस हॉटेलचे बिल भरण्यासाठी त्याने हॉटेलला पोस्ट-डेटेड चेक दिले होते. परंतू ते वटले नाहीत. अबू धाबीच्या राजघराण्यातील सदस्य शेख फलाह बिन झायेद अल नाह्यान यांच्या कार्यालयात काम करतो असे सांगून त्याने हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला होता, तो काही महिने अबुधाबी आणि दुबईमध्ये राहिला होता, पण त्याने राजघराण्यासोबतची नोकरी सोडली आहे. इतर शहरातील काही हॉटेल्समध्येही त्याचा मुक्काम केला होता. आम्ही त्या हॉटेल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत आहोत असे दिल्ली पोलीसांनी म्हटले आहे.