दुदैवी घटना ! राजमाची किल्यालगतच्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरून पडून ट्रेकर्सचा मृत्यू ; आठवड्यातील दुसरी घटना

घटनेच्या दिवशी प्रतीक आवळे, पंकज गावदाडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ आणि सागर जैस्वाल हे 5 जण औरंगाबादहून ट्रेक आले होते. ट्रेकी सुरु झाल्यानंतर प्रतीक आवळे याचा तोल गेल्याने तो खाली पडला, त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला.

दुदैवी घटना ! राजमाची किल्यालगतच्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरून पडून ट्रेकर्सचा मृत्यू ; आठवड्यातील दुसरी घटना
dhak bhahiri
| Updated on: Feb 06, 2022 | 5:08 PM

पुणे – नाशिकमधील शेंडीच्या डोंगरावरून पडून दोन ट्रेकर्स  मृत्यू  (Trekkers death )झाल्याची घटना ताजी असतानाच पुणे जिल्ह्यातील राजमाची किल्ल्या (Rajmachi forts)लगत असलेल्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरुन पडून एका ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत ट्रेकर्स प्रतीक आवळे (रा. औरंगाबाद) असे या ट्रेकर्सचे नाव आहे.प्रतीक आवळे, पंकज गावदाडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ आणि सागर जैस्वाल हे 5 जण औरंगाबादहून ट्रेक आले होते. ट्रेकी सुरु झाल्यानंतर प्रतीक आवळे याचा तोल गेल्याने तो खाली पडला, त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला.  ढाक बहिरी हा कर्जत (karjat)व मावळ (Mawal)तालुक्याच्या मध्यावर असलेला उंच सुळका आहे. अनेक जण याठिकाणी ट्रेकिंगसाठी जात असतात. हा सुळका चढण्यासाठी अरुंद स्वरूपाची वाट आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी प्रतीक आवळे, पंकज गावदाडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ आणि सागर जैस्वाल हे 5 जण औरंगाबादहून ट्रेक आले होते. ट्रेकी सुरु झाल्यानंतर प्रतीक आवळे याचा तोल गेल्याने तो खाली पडला, त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला. त्याच दरम्यान ट्रेकिंगसाठी आलेल्या तुषार महाडिक व भारत रायकर या दोघांनी ही घटना बघितली. त्यांनी मृत प्रतीक आवळे व इतर चार जणांना व्यवस्थित जागेवर घेतले. या घटनेची माहिती समजताच संतोष दगडे व त्यांची टीम कर्जत तसेच स्थानिक गावकरी लगेच ढाक बहिरी जवळ पोहोचले तसेच यशवंती हायकर्स खोपोली ची टीम साहित्यासह ढाकच्या डोंगरावर पोहोचली. मृत प्रतीक व त्याचे सहकारी यांना कर्जत मधील सांडशी गावाच्या वाटेने खाली आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. या मदतकार्यावेळी काळोख असल्याने तसेच पायवाट, डोंगर उतार व कड्याच्या बाजूची अरुंद जागा यातून सर्व ट्रेकर्स टीम व गावकरी यांनी प्रतीकचा मृतदेह व इतर चौघांना  खाली सांडशी गावात आणले आणि त्यानंतर कर्जतला पाठवण्यात आले.

Video | Accident | पाम बीचवर स्पोर्ट्स बाईक आणि इनोव्हाची जोरदार धडक! सिग्नल तोडला नसता तर…

धक्कादायक! एकाच रात्री तीन गावातील 9 दुकानांत चोरी; एकाला अटक, दोन फरार

बीडच्या शेतकऱ्याचा नादच खुळा : पठ्ठ्याने तीन वर्ष परीश्रम केले पण पाणी टंचाईवर कायमचा तोडगाच काढला