पालकांना सांगण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, पोलिसांनी 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या

विष्णुनगर पोलीस आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विष्णु भांडेकर याला नेवाळी नाका परिसरातून आणि आशिष गुप्ता याला कल्याण पुर्वेतून त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

पालकांना सांगण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, पोलिसांनी 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपींना अटक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 30, 2023 | 1:25 PM

डोंबिवली : डोंबिवली जवळील ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात भर दिवसा एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी दोनआरोपींना अटक केली आहे. पोलीस असल्याचे सांगून दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. आरोपींनी याप्रकरणी कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करु, अशी धमकी पिडीत तरुणीला दिली होती. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पथके स्थापन केली होती. या पथकांनी कसून तपास करत 24 तासाच्या आत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या.

विष्णुनगर आणि मानपाडा पोलिसांची संयुक्त कारवाई

विष्णु भांडेकर आणि आशिष गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विष्णुनगर पोलीस आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विष्णु भांडेकर याला नेवाळी नाका परिसरातून आणि आशिष गुप्ता याला कल्याण पुर्वेतून त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

विष्णु भांडेकर अट्टल गुन्हेगार

विष्णु भांडेकर या आरोपीवर याआधी देखील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले. तसेच याआधीही या आरोपींनी अशा प्रकारे गुन्हा केला आहे का याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.

मित्रासोबत फिरायला गेले होती मुलगी

पीडित तरुणी बारावीची विद्यार्थिनी असून, मित्रासोबत ठाकुर्ली खाडीकिनारी फिरायल गेली होती. यावेळी दोघे आरोपी त्यांच्याजवळ गेले आणि आपण पोलीस असल्याची बतावणी केली.

तसेच आमच्या मोठ्या साहेबांकडे चला सांगून मुलीला आणि तरुणाला वेगगेवळ्या ठिकाणी नेले. मग आरोपींनी आळीपाळीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपी तेथून पळून गेले.