खेळता खेळता बेपत्ता झाली.. कारमध्ये दोन भावंडं मृतावस्थेत सापडली; अँटॉप हिल हादरलं

मुंबईत एका कारमध्ये दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अँटॉप हिल परिसरात हा दुर्दैवी आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.

खेळता खेळता बेपत्ता झाली.. कारमध्ये दोन भावंडं मृतावस्थेत सापडली;  अँटॉप हिल हादरलं
Follow us
| Updated on: Apr 25, 2024 | 4:11 PM

मुंबईत एका कारमध्ये दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अँटॉप हिल परिसरात हा दुर्दैवी आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. मृतांमध्ये एका 7 वर्षांच्या मुलाचा आणि 5 वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा समावेश आहेत. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात यापूर्वी बेपत्ता व्यक्तींची तक्रार नोंदवण्यात आली होती. चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एकच खळबळ माजली असून मृतांच्या कुटुंबियांच्या शोकाला पारावार उरलेला नाही. परिसरात शोकाकुल वातावरण आहे.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, ७ वर्षांचा मुलगा आणि त्याची ५ वर्षांची बहीण अँटॉप हिल परिसरात आई-वडिलांसह रहात होते. बुधवारी दुपारी ते दोघे एकत्र खेळण्यास बाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. मुलं कुठेच न सापडल्याने अखेर त्यांच्या आई-वडिलांनी अँटॉप हिल पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत मुल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतल्यानंतर पोलिसांना एका जुन्या कारमध्ये मुलांचे मृतदेह सापडले. मुले कारमध्ये खेळत असताना त्यातच अडकली आणि गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गुदमरून झाला दोघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशनमधील अधिकारी त्या बेपत्ता मुलांचा शोध घेत असताना एका महिला अधिकाऱ्याला घराजवळ उभी असलेली भंगारावस्थेतील कार दिसली. मात्र त्या कारचा दरवाजा बंद होता आणि रात्री उशीर झाल्यामुळे, काळोखात आतलं काहीच नीट दिसत नव्हतं. अखेर त्या महिला पोलीस अधिकाऱ्याने मोबाईलच्या फ्लॅश ऑन केला आणि कारच्या काचेच्या खिडकीतून आत पाहिलं. तेव्हा त्यांना दोन्ही मुल कारमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. पोलिसांनी त्यांना लगेच बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात उपचार मिळण्यापूर्वीच दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दुपारी दीड वाजता कारमध्ये मुलं अडकली, रात्री 10 वाजता लागला शोध

याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ADR नोंदवून पुढील तपास करत आहेत. मुलांचे आई-वडील अतिशय शोकाकुल आहेत. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास आमची दोन्ही मुलं घराजवळ खेळत होती. काही वेळाने आम्ही त्यांना दोघांना जेवायला बोलावले, पण त्यांचा काहीच आवाज आला नाही. म्हणून आम्ही बाहेर येऊन शोधले असता, ते कुठेच दिसले नाहीत. मुलं बेपत्ता झाल्याचे पालकांच्या लक्षात आले आणि त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.  दुपारच्या सुमारास गायब झालेली मुलं रात्री दहाच्या सुमारास कारमध्ये सापडली खरी, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.