बहिणीच्या बॉयफ्रेंडला खेळायला बोलावलं अन् नंतर चाकूने केली… वाचून उडेल थरकाप

या मुलाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते, मात्र ते त्या तरूणीच्या भावाला पसंत नव्हते. याच वादातून हे कृत्य करण्यात आले.

बहिणीच्या बॉयफ्रेंडला खेळायला बोलावलं अन् नंतर चाकूने केली... वाचून उडेल थरकाप
| Updated on: May 12, 2023 | 4:23 PM

UP Murder News : बहिणीच्या बॉयफ्रेंडला खेळायला घरी बोलावून त्याची हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शामली जिल्ह्यातील एका गावात दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाची प्रेमप्रकरणातून वार करून हत्या करण्यात आली. गुरमीत असे त्याचे नाव असून त्याचा मृतदेह उसाच्या शेतातून सापडला आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.

ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी कांधला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमुलपूर गावात घडली. शामलीचे पोलिस अधीक्षक अभिषेक यांनी पत्रकारांना सांगितले की, पोलिसांनी मृत गुरमीतच्या तीन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, त्यापैकी दोन अल्पवयीन आहेत. पोलिसांनी घटनेत वापरलेला चाकूही जप्त केला आहे.

चौकशीदरम्यान एका आरोपी सौरभने पोलिसांना सांगितले की, गुरमीतचे एका आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते आणि ते याच्या विरोधात होते.
सौरभसह तिन्ही मित्रांनी गुरमीतला खेळायला बोलावून त्याची चाकूने वार करून हत्या केली आणि मृतदेह उसाच्या शेतात फेकल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us