Suicide | अल्पवयीन प्रेमी युगुलांची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, भावाला मेसेज करत म्हटले की….!

| Updated on: Jun 28, 2022 | 4:31 PM

चार महिन्यांपूर्वी या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिला तिच्या आजीच्या गावी खमरिया येथे पाठवले. रविवारी दोघे भेटले आणि सकाळी दोघांचे मृतदेह झाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलीस अधिकारी अंबिका राम यांनी सांगितले की, मृत अल्पवयीन होते. मुलगी 16 आणि मुलगा 17 वर्षांचा होता.

Suicide | अल्पवयीन प्रेमी युगुलांची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, भावाला मेसेज करत म्हटले की....!
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बस्ती येथे एक धक्कादायक घटना घडलीयं. एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीयं. सीओ अंबिका राम यांनी सांगितले की, खमरिया (Khamriya) गावातील गौसियाहवा पोखरेजवळ सकाळी 16 वर्षीय मुलगी आणि 17 वर्षीय मुलाचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी (Police) दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडालीयं. दोघेही एकाच वर्गामध्ये शिकत असल्याची माहिती मिळते आहे.

भावाला केला शेवटच्या मेसेज…

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या भावाने सांगितले की, रविवारी त्याचा भाऊ घरातून निघून गेला होता. उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याला फोन केला असता त्याने फोनला कोणतेही उत्तर दिले नाही आणि तो फोन कट कर होता. मात्र, फोनवरून त्याने मेसेज केला की, मी खूप दूर जात आहे. परत कधीच येणार नाही. हे प्रेमी युगुल एकाच वर्गात शिकत होते. गेल्या एका वर्षांपासून दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते.

हे सुद्धा वाचा

रविवारी दोघे भेटले आणि सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आले

चार महिन्यांपूर्वी या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिला तिच्या आजीच्या गावी खमरिया येथे पाठवले. रविवारी दोघे भेटले आणि सकाळी दोघांचे मृतदेह झाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलीस अधिकारी अंबिका राम यांनी सांगितले की, मृत अल्पवयीन होते. मुलगी 16 आणि मुलगा 17 वर्षांचा होता. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. मुलीच्या घरच्यांनी यावर बोलण्यास नकार दिल्याचे कळते आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की, मुलीच्या आईचे निधन झाले असून वडील मुंबईतमध्ये आहेत.