Theft | दुचाकीला धडक देऊन 7 लाख रुपयांची बॅग केली लंपास, फिल्मी स्टाईलमध्ये चोरी!

| Updated on: Jun 29, 2022 | 1:02 PM

हा सर्व प्रकार मेरठमधील कंकरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली डेहराडून रोडवरील आहे. पेट्रोल पंपाचा मॅनेजर बँकेत सात लाख रुपये जमा करण्यासाठी दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकींवर आलेल्या चोरट्यांनी त्यांना पाठीमागून धडक दिली आणि त्यांना खाली पाडले. त्यानंतर चोरट्यांनी हत्यारे दाखवत नोटांनी भरलेली बॅग लंपास केली.

Theft | दुचाकीला धडक देऊन 7 लाख रुपयांची बॅग केली लंपास, फिल्मी स्टाईलमध्ये चोरी!
Image Credit source: tv9
Follow us on

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये एका पेट्रोल पंपाच्या मॅनेजरकडून दुचाकीस्वार चोरट्यांनी भरदिवसा 7 लाखांची लूट केलीयं. ही घटना एकदम फिल्मीस्टाईलमध्ये करण्यात आलीयं. अगोदर मॅनेजरच्या गाडीला मागून धडक दिली, त्यानंतर पैशांनी भरलेली बॅग घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली. लूटीची माहिती (Information) मिळताच एसएसपी, एसपी आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज स्कॅन केले. मॅनेजरने (Manager) पोलिसांना सांगितले की, जेव्हा त्याने या चोरट्यांना विरोध केला तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली.

चोरट्यांनी केली मॅनेजर मारहाण

हा सर्व प्रकार मेरठमधील कंकरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली डेहरादून रोडवरील आहे. पेट्रोल पंपाचा मॅनेजर बँकेत सात लाख रुपये जमा करण्यासाठी दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकींवर आलेल्या चोरट्यांनी त्यांना पाठीमागून धडक दिली आणि त्यांना खाली पाडले. त्यानंतर चोरट्यांनी हत्यारे दाखवत नोटांनी भरलेली बॅग लंपास केली. इतकेच नाही तर मॅनेजरने या चोरट्यांनाविरोध केला असता या चोरट्यांनी मॅनेजरला मारहाण करण्यासही सुरूवात केली.

हे सुद्धा वाचा

मेरठचे एसएसपी रोहित सिंह यांनी सांगितले की…

मेरठचे एसएसपी रोहित सिंह यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन कंकरखेडा परिसरात राष्ट्रीय महामार्ग 58 वर इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपचे मॅनेजर 7 लाख रुपये बॅंकेत भरण्यासाठी दुचाकीवरून निघाले असता काही लोकांनी अडवून मारहाण करून बॅग हिसकावून घेतली असल्याची माहिती पेट्रोल पंपच्या मालकाने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिलीयं.