धक्कादायक ! चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी तांत्रिकाने अडीच वर्षाच्या निष्पाप लेकराचा बळी घेतला

चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी एका तांत्रिकाने रामावतारचा मुलगा ऋतिकचा बळी दिला. गुन्हा लपवण्यासाठी तांत्रिकाने मुलाचा मृतदेह पोत्यात भरून किबार नदीत फेकून दिला. इकडे रामअवतार यांनी आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी जमीन आसमान एक केले होते. खूप प्रयत्न करूनही आपला मुलगा भेटत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला.

धक्कादायक ! चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी तांत्रिकाने अडीच वर्षाच्या निष्पाप लेकराचा बळी घेतला
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 11:11 AM

मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा येथे एका तांत्रिकाने चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी क्रुरतेचा कळस गाठलायं. अडीच वर्षाच्या कोवळ्या लेकराचा बळी घेतला. पोलिसांनी (Police) तांत्रिक भोला उर्फ ​​हुकुम सिंग याला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने (Accused) सांगितले की, त्याची तांत्रिक शक्ती संपत चालली होती, ताकद वाढवण्यासाठी त्याला चामुंडा देवीला प्रसन्न करणे गरजेचे होते आणि त्यामुळे त्याने या मुलाचा बळी दिलायं. हे प्रकरण 15 जून रोजी जगनेर पोलीस ठाण्यातील एका गावामध्ये घडले आहे. या तांत्रिकाच्या अंधश्रध्देमुळे एका निष्पाप लेकराचा बळी गेला.

चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी तांत्रिकाने केली हत्या

चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी एका तांत्रिकाने रामावतारचा मुलगा ऋतिकचा बळी दिला. गुन्हा लपवण्यासाठी तांत्रिकाने मुलाचा मृतदेह पोत्यात भरून किबार नदीत फेकून दिला. इकडे रामअवतार यांनी आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी जमीन आसमान एक केले होते. खूप प्रयत्न करूनही आपला मुलगा भेटत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

मुलाचा मृतदेह सापडला नदी सापडल्याने एकच खळबळ

रामअवतार यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता मुलाचा मृतदेह सापडला. मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर गावातील एका व्यक्तीने पोलिसांची मदत केली. तांत्रिकसोबत जाताना त्याने हृतिकला पाहिल्याचे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिकला अटक करून चाैकशी केली असता धक्दाकायदक माहिती पुढे आली.

आरोपीचा मुलाच्या वडिलांच्या जमिनीवर होता डोळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हुकुम सिंग उर्फ ​​भोला हृतिकचे वडील रामअवतार यांच्या जमिनीवर डोळा ठेऊन होता. हृतिकचे वडील रामअवतार यांना तांत्रिकच्या वडिलांनी दत्तक घेतले होते. हुकुम सिंगला वाटले की जर त्याने हृतिकला मारले तर रामअवतार गाव सोडून जाईल आणि जमीन आपल्याला मिळेल. हुकुम सिंगचा तंत्र-मंत्रावरही खूप विश्वास आहे. त्याला वाटले की हृतिकला मारल्याने देवीही प्रसन्न होईल म्हणजेच काय तर एका दगडात दोन तीर.

आग्रा ग्रामीणचे एसपी सत्यजित गुप्ता यांनी सांगितले की..

आग्रा ग्रामीणचे एसपी सत्यजित गुप्ता यांनी सांगितले की, आरोपीला वाटत होते की त्याची तांत्रिक शक्ती काम करत नाहीये. जर त्याने मुलाचा बळी दिला तर त्याची शक्ती परत येईल. मुलगा खेळत असताना आरोपीने त्याला आपल्यासोबत नेऊन त्याची हत्या केली. त्याला मारल्यानंतर त्याने मुलाचा मृतदेह देवीच्या समोर ठेवला आणि मंत्रोच्चार केला. यानंतर मुलाचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकला.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.