धक्कादायक! स्टॅमिनाच्या गोळ्या खाऊन नराधमाचा तरुणीवर बलात्कार, कुठे घडली घटना?

तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून नराधमाचा पळ! पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

धक्कादायक! स्टॅमिनाच्या गोळ्या खाऊन नराधमाचा तरुणीवर बलात्कार, कुठे घडली घटना?
संतापजनक घटना
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 14, 2022 | 12:53 PM

उत्तर प्रदेश : स्टॅमिनाच्या गोळ्या खाऊन एका 25 वर्षीय तरुणाने तरुणीवर बलात्कार (Rape case) केला. तरुणीच्या घरात कुणी नाही, हे पाहून तरुणाने डाव साधला. त्यानंतर तरुणीच्या गुत्पांगातून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. रक्त पाहून भयभीत झालेल्या तरुणाने तिला तशाच अवस्थेत घरात सोडलं आणि पळ काढला. यात पीडितेचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Crime News) उन्नाव इथं ही संतापजनक घडलीय. दरम्यान, पोलिसांनी (Up Unnao Rape News) नराधमाला अटक केलीय. पोलीस तपासात या बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहितीही समोर आलीय.

अटक करण्यात नराधम आरोपीचं नाव राज गौतम असं आहे. पीडिता तिच्या घरात एकटी असताना राज गौतम हा घरात घुसला. त्याआधी राज याने क्षमता वाढवण्याऱ्या गोळ्यांचं सेवन केलं होतं, असंही समोर आलंय. यानंतर पीडितेसोबत त्याने गैरकृत्य केलं.

बलात्कारानंतर पीडितेच्या गुत्पांगातून मोठा रक्तस्त्राव झाल्यानं आरोपी राज गौतम घाबरला. पीडितेला तशा अवस्थेत ठेवून त्याने घरातून पळ काढला. दरम्यान, पीडिता घरात विव्हळत पडली होती. पीडितेची लहान बहीण जेव्हा घरी आली, तेव्हा घरातलं दृश्य पाहून ती हादरुनच गेली.

पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पीडिता बेडवर बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. जखमी अवस्थेतील पीडितेला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यात आलं. पण तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गुप्तांगातून झालेल्या प्रचंड रक्तस्त्रावामुळेच पीडितेचा जीव गेल्याचं तपासातून समोर आलं.

दरम्यान, या बलात्कार प्रकरणी आरोपी राज गौतम यानेही गोळ्यांचं सेवन केल्याची कबुली दिली आहे. तर दुसरीकडे पीडितेच्या वडिलांनी शेजारी राहणाऱ्या 65 वर्षांच्या महिलेवरही मुलीच्या बलात्कार प्रकरणी सहभागी असल्याचा आरोप केलाय. पीडितेच्या फोनमधील डेटाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी राज गौतम याला अटक केलीय. सध्या याप्रकरणी पुढील कारवाई केली जातेय.