हॉटेल रुममध्ये महिला पोलिसासोबत पकडलं, DSP ला थेट बनवलं शिपाई, कोण आहे हा पोलीस अधिकारी?

Extramarital Affair : त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात पोलीस कॉन्स्टेबल पदापासून केली होती. परीक्षा देऊन पास झाले. वरिष्ठ पद मिळवली. पण आता ते पुन्हा एकदा पोलीस शिपायाच काम करताना दिसणार आहेत. कोण आहेत हे पोलीस अधिकारी?

हॉटेल रुममध्ये महिला पोलिसासोबत पकडलं, DSP ला थेट बनवलं शिपाई, कोण आहे हा पोलीस अधिकारी?
dsp kripashankar
| Updated on: Jun 24, 2024 | 12:55 PM

कृपाशंकर कन्नौजिया….हे नाव सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कृपाशंकर उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील बीघापुरमध्ये डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलिसच्या (डीएसपी) पदावर तैनात होते. पण त्यांनी एक मोठी चूक केली. त्यामुळे फक्त त्यांच्या प्रतिष्ठेलाच धक्का पोहोचला नाही, तर थेट डिमोशन झालं. डीएसपी राहिलेले कृपाशंकर आता पोलीस कॉन्स्टेबलच्या पदावर नोकरी करताना दिसतील.

कृपाशंकर बीघापुर सर्कलच्या डीएसपी पदावर तैनात होते. एक दिवस ते वेळेवर घरी पोहोचले नाहीत. त्यावरुन पत्नीने उन्नावच्य एसपीकडे तक्रार केली. एसपीने डीएसपी कृपाशंकर यांचा फोन सर्विलांसला लावला. त्यामुळे त्यांचं लोकेशन समजलं. कानपुरच्या एका हॉटेलच लोकेशन होतं. त्यानंतर एक पोलीस टीम बनवण्यात आली. तात्काळ पोलीस टीम कानपूरला रवाना करण्यात आली. तिथे एका हॉटेलच्या रुममध्ये कृपाशंकर कन्नौजिया महिला कॉन्स्टेबल सोबत होते.

शिपाई म्हणून जॉईंन झाले का?

कृपाशंकर कन्नौजिया यांनी आपल्या नोकरीची सुरुवात पोलीस कॉन्स्टेबल पदापासून केली होती. 1986 साली त्यांची शिपाई पदावर तैनाती झाली. त्यानंतर त्यांनी विभागीय परिक्षा दिली. ती पास करुन ते शिपाईवरुन दरोगा बनले. काही दिवस या पदावर काम केलं. त्यांना नंतर प्रमोशन मिळालं. इंस्पेक्टरच पद त्यांना मिळालं. काही काळ इंस्पेक्टर म्हणून काम केल्यानंतर RI बनवण्यात आलं. सीओच्या रँकवर प्रमोट केलं. पण एका चुकीमुळे त्यांना गोरखपूर पीएसी येथे पाठवण्यात आलं. अजून शिपाई म्हणून तो जॉईंन झालेले नाहीत.

ते वेळेवर घरी आले नाहीत

कृपाशंकर मूळचे देवरियाचे आहेत. ते वेळेवर घरी आले नाहीत, म्हणून पत्नीने एसपीकडे तक्रार केली. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यानंतर डीजीपीने त्यांना निलंबित केलं. पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणार काम करताना ते आढळले. त्यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. आता त्यांना 26 वी वाहिनीच्या पथकात नियुक्त करण्यात आलय.