AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फाल्गुन अमावस्या तिथीला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या हे नियम

अमावस्येचा दिवस पूर्वजांना समर्पित मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांची पापे दूर होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. तर आजच्या लेखात आपण फाल्गुन अमावस्येला काय करावे आणि काय करू नये ते जाणून घेणार आहोत.

फाल्गुन अमावस्या तिथीला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या हे नियम
AmawasyaImage Credit source: Google
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Feb 16, 2026 | 10:57 PM
Share

सनातन धर्मात अमावस्येचा दिवस खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. धार्मिक आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अमावस्येचा दिवस खूप विशेष मानला जातो. या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. तसेच या दिवशी दान करण्यालाही अधिक महत्व आहे . पूजा-पाठ देखील केले जाते. ज्योतिषशास्त्रानूसार असे मानले जाते की फाल्गुन अमावस्येच्या दिवशी ही कामे केल्याने व्यक्तीला विशेष पुण्य मिळते. या दिवशी केलेल्या उपासनेमुळे कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती देखील सुधारते.

या महिन्यात येणारी अमावस्या फाल्गुन अमावस्या आहे. उद्या 17 फेब्रुवारी रोजी ही अमावस्या साजरी केली जाईल. ही अमावस्या पूर्वजांना समर्पित मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांची पापे दूर होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. तर आजच्या लेखात आपण या अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेणार आहोत.

फाल्गुन अमावस्येला काय करावे?

  • अमावस्येच्या दिवशी, सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा, ध्यान करा आणि देव-देवतांची तसेच तुमच्या पूर्वजांची पूजा करा.
  • तुमच्या पूर्वजांना काळे तीळ आणि कुश (गवताचा प्रकार) मिक्स केलेले पाणी अर्पण करा.
  • या दिवशी ब्लँकेट, कपडे, अन्न आणि पैसे दान करा. पूर्वजांच्या शापांपासून मुक्त होण्यासाठी, पिंपळाच्या झाडाची पूजा करा.
  • तसेच या अमावस्येला एका निर्जन ठिकाणी ध्यान करा. असे केल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक ज्ञान मिळते. धार्मिक पुस्तकांचा अभ्यास करा. भगवान शिव, विष्णू, सूर्य देव, लक्ष्मी देवी आणि सरस्वती माता यांना समर्पित मंत्रांचा जप करा.

फाल्गुन अमावस्येला काय करू नये?

  • चुकूनही अमावस्येच्या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करणे टाळा. मांस, मद्य, लसूण आणि कांदे खाणे टाळा.
  • नखे किंवा केस कापणे टाळा. तसेच घरी सदस्यांशी वादविवाद करणे टाळा.
  • फाल्गुन अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण होत आहे, म्हणून प्रवास करणे टाळा. या दिवशी तुळशीची पाने, बेलाचे पान किंवा इतर औषधी वनस्पती तोडू नका. दिवसा झोपणे टाळा. वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका. निर्जन ठिकाणी जाणे टाळा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा