
एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईची डोक्यावर काठीने प्रहार करुन हत्या केली. 23 डिसेंबरची ही घटना आहे. मुलाने आईला तिचा प्रियकर भूरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. त्यानंतर त्याचा संयम सुटला. रागाच्या भरात त्याने आईची हत्या केली. हत्येनंतर आरोपी संपूर्ण रात्री मृतदेहासोबत घरातच राहिला. बुधवारी 24 डिसेंबरच्या सकाळी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्याने आईच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला. पोलिसांनी जेव्हा प्रियकर आणि अल्पवयीन मुलाची कसून चौकशी केली, तेव्हा सत्य समोर आलं. मृत महिलेचा पती आणि आरोपीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील कासगंजच्या हकीमगंज गावात ही घटना घडली.
हकीमगंज येथे राहणारे सत्यपाल पंजाबमध्ये वीट भट्टीवर काम चौकीदाराचं काम करतात. त्यांची पत्नी गावाकडे मुलासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती पंजाबवरुन कासगंज येथील गावी आली होती. 23 डिसेंबरच्या रात्री रेखा आणि तिचा प्रियकर भुरा एकत्र बसून दारु प्याले. त्याचवेळी तिच्या मुलाने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं. रागाच्या भरात मुलाने दांडा उचलला आणि तिचा प्रियकर भुरावर हल्ला केला. पण तो तिथून निसटला. नंतर त्याने त्याच दांड्याने आईच्या डोक्यावर प्रहार केले.
त्यामुळे तो चिडला
जखमी अवस्थेत रेखा जमिनीवर पडली.बराचवेळी आरोपी मुलगा रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आईच्या बाजूला बसून होता. मग तो तिथेच झोपला. रात्रभर रक्तस्त्राव झाल्याने रेखाचा मृत्यू झाला. सकाळी उठल्यावर मुलाने भुरावर आईच्या हत्येचा आरोप केला. पोलिसांनी भुराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने रात्रभरात काय घडलं ते पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर तो चौकशीमध्ये तुटला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अपर पोलीस अधीक्षक सुशील कुमार यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलाने आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यामुळे तो चिडला. त्याने आईची हत्या केली. सध्या मुलाला ताब्यात घेतलं आहे. पुढील कारवाई सुरु आहे.