अनैतिक संबंधातून पत्नीचा मृत्यू, त्यानंतर पतीने आणि मुलाने मिळून जे केलं त्याने सगळेच हादरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगर गावात राहणाऱ्या मनोजच्या पत्नीचे अक्षयसोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. याची माहिती मनोज आणि त्याच्या कुटुंबाला झाल्यानंतर घरात वादविवाद सुरु झाले.

अनैतिक संबंधातून पत्नीचा मृत्यू, त्यानंतर पतीने आणि मुलाने मिळून जे केलं त्याने सगळेच हादरले
muzaffarnagar murder case
| Updated on: Mar 26, 2026 | 2:10 PM

एक हैराण करुन सोडणारी मर्डर मिस्ट्री समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पिता-पुत्राला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मृत युवकाचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याचा खुलासा झाल्यानंतर आरोपीच्या पत्नीने सहा महिन्यापूर्वी आपलं जीवन संपवलं. पत्नीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आरोपीने आणि त्याच्या अल्पवयीन मुलाने पत्नीच्या प्रियकरावर आधी धारदार शस्त्राने वार केला. मग गोळी झाडून त्याला संपवलं. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधील हे प्रकरण आहे. पोलिसांनी ही ब्लाइंड मर्डर केस सोडवली आहे.

पोलिसांनी प्रकरणाचा खुलासा करताना महिलेचा पती आणि मुलाला अटक करुन तुरुंगात पाठवलय. भोपा पोलीस ठाणे क्षेत्रातील शाहदरा बांगर गावचं हे प्रकरण आहे. गावात राहणाऱ्या अक्षय नावाच्या युवकाची 23 मार्च रोजी हत्या झाली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करताना संशयाच्या आधारावर एक अल्पवयीन मुलाला अटक केली. त्याच्या चौकशीतून सर्व सत्य समोर आलं.

त्याचा राग मनात होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगर गावात राहणाऱ्या मनोजच्या पत्नीचे अक्षयसोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. याची माहिती मनोज आणि त्याच्या कुटुंबाला झाल्यानंतर घरात वादविवाद सुरु झाले. मनोजच्या पत्नीने सहा महिन्यापूर्वी विष प्राशन करुन जीवन संपवून घेतलं. यामुळे मनोजच्या कुटुंबाच नाव गावात खूप खराब झाला. त्याचा राग त्याच्या मनात होता. इभ्रती गेली त्याचा बदला घेण्यासाठी मनोज आणि त्याच्या मुलाने मिळून अक्षयची हत्या केली.

अक्षयने गाव सोडलं होतं

मनोजच्या पत्नीच्या मृत्यूनंतर अक्षयने गाव सोडलं होतं. पण नुकताच तो गावात परतला होता. त्यानंतर मनोजने अक्षयच्या हत्येचा प्लान बनवला. मुलासोबत मिळून मनोजने अक्षय शेतातून परतत असताना त्याचा मार्ग रोखला. दोघांनी आधी अक्षयवर धारदार शस्त्राने वार केला. पण अक्षय जिवंत होता. मग दोघांनी गोळी मारुन त्याची हत्या केली. एसपी ग्रामीण आदित्य बन्सल यांच्यानुसार त्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Follow Us