AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : ठाणे हादरलं, वर्गणीच्या वादातून डायरेक्ट एकाच्या डोक्यात चॉपरने वार

Thane Crime : ठाण्यात वर्गणी मागायला गेलेल्या एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने डोक्यात हल्ला करण्यात आला. या प्रकाराने सगळेच जण हादरले आहेत.

Thane Crime : ठाणे हादरलं, वर्गणीच्या वादातून डायरेक्ट एकाच्या डोक्यात चॉपरने वार
Thane Crime
| Updated on: Mar 25, 2026 | 2:09 PM
Share

मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्गणी मागण्याच्या वादातून हा सर्व प्रकार घडला आहे. ठाणे शहरातील गावदेवी परिसरात ही घटना घडली. गावदेवी परिसरात साई मंदिरात भजन-कीर्तन सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यासाठी वर्गणी मागायला गेलेल्या एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने डोक्यात हल्ला करण्यात आला. या प्रकाराने सगळेच जण हादरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचे सभासद ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गावदेवी मार्केट परिसरात वर्गणी मागण्यासाठी गेले होते.

यावेळी नवनाथ वायकर नावाच्या व्यक्तीने अचानक चॉपर काढला आणि किशोर अंकुश नरे यांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात किशोर नरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नौपाडा पोलिस पुढील तपास करत आहेत

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोर नवनाथ वायकर याच्याविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे ठाण्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे.

तातडीने पोस्ट ऑफिस खाली करण्यात आलं

नंदुरबार पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट ऑफिसमध्ये आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा मेल आला आहे. नागपूर कार्यालयाला मेल आला असून राज्यातील सर्वे पासपोर्ट ऑफिस आणि पोस्ट ऑफिस उडवून देण्याचा मेल आला होता. विभागीय कार्यालयातून माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोस्ट ऑफिस खाली करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व टपाल कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालय दुपारी बारा वाजून दहा मिनिटाला उडवून देण्यात येणार असल्याचा मेल आला आहे. माहिती मिळाल्यानंतर तातडीने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे. विभागीय कार्यालयाकडून माहिती मिळाल्यानंतर तातडीने टपाल कार्यालय रिकामी करण्यात आलं आहे.

बीड शहरातील पोस्ट ऑफिस उडवून देण्याची धमकी

पोस्ट ऑफिसमधील पासपोर्ट कार्यालयाला इमेल करून धमकी. धमकी आल्याने बीडमध्ये खळबळ. पोलिस पथक घटनास्थळी दाखल. ईमेल कोणी केला याची चौकशी सुरू.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'