
आजच्या तारखेला विवाहबाह्य संबंध असणं अजिबात नवीन राहिलेलं नाही. अशी अनेक प्रकरण समोर आली आहेत, ज्यात पती किंवा पत्नी आपल्या जोडीदाराला धोका देतात, बाहेर त्यांचं अफेअर सुरु असतं. एका 40 वर्षाच्या महिलेचा 24 वर्षाच्या युवकावर जीव जडला. ती त्याच्या प्रेमात पडली. महिला विवाहित आहे. तिला पती आणि पदरात चार मुलं आहेत. पण त्यांची पर्वा केल्याशिवाय ती प्रियकरासोबत पळून गेली. उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमधील हे प्रकरण आहे.
नवऱ्याला या बद्दल समजल्यानंतर तो धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. महिला सुद्धा तिथे पोहोचली. तिने सांगितलं, साहेब, मी माझ्या प्रियकरासोबत कोर्ट मॅरेज केलय. आता मी याच्यासोबत राहणार नाही. हे ऐकून पती हैराण झाला. त्यानंतर पती जे काही बोलला, ते ऐकून पोलीस सुन्न झाले.
पतीला वाटलं की, सर्व काही आता व्यवस्थित झालय, पण….
भवानीगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावच हे प्रकरण आरहे. चार मुलांच्या आईने नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लग्न केलं. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच आणि मुलाच चार वर्षांपासून अफेअर सुरु होतं. पती नोकरीसाठी मुंबईत असायचा. बायकोच्या अफेअरबद्दल समजताच गावी परतला. त्यानंतर महिलेला तिच्या प्रियकराला भेटता येत नव्हतं. तिला पती मार्गात अडथळा वाटू लागला. मग, एकदिवस महिला प्रियकरासोबत पळून गेली. पण अचानक तिच्या मनाला काय वाटलं काय माहित, ती पुन्हा पतीकडे आली. पतीला वाटलं की, सर्व काही आता व्यवस्थित झालय. पण तो चुकीचा होता.
हे ऐकून पोलीसही दंग राहिले
काही महिने पतीसोबत राहिल्यानंतर महिला पुन्हा पती आणि चार मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली. यानंतर पतीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दोघांना चौकीत बोलावलं. यावेळी महिलेने पोलिसांना कोर्ट मॅरेज केल्याची माहिती दिली. प्रियकरासोबत रहायचं असल्याच तिने सांगितलं. पती त्यावेळी पोलिसांना म्हणाला की, साहेब हिला ज्याच्यासोबत रहायचं आहे, त्याच्यासोबत राहू दे. नाहीतर, ही मला विष घालून मारुन टाकेल. त्यामुळे हिला जे काही करायचय ते करुं दे. मी माझ्या चार मुलांचा एकटा संभाळ करीन. हे ऐकून पोलीसही दंग राहिले. कुठला पती इतक्या सहजतेने पत्नीला कोणा दुसऱ्यासोबत कसं जाऊ देईल. पण निर्णय पतीचा होता. त्यांनी महिलेला तिच्या प्रियकरासोबत जाऊ दिलं. इथे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे.