
पुण्याच्या मुळशी जवळील गावात राहणाऱ्या वैष्णवी हगवणे या अवघ्या 23 वर्षांच्या महिलेच्या मत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. 16 मेला तिने तिचं जीवन संपवलं. हुंड्यासाठी छळ करून वैष्णवीला आयुष्य संपवण्यास भाग पाडल्यापप्रकरणी अटकत्यानंतर वैष्णवीचा पती, नणंद, सासू, सासरे आणि दीर या पाच जणांना अटक करण्यात आली. काल त्यांची पोलीस कोठडीची मदुत संपल्याने न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने हगवणे कुटुंबाच्या पोलीस कोठडीत वाढ केली. , वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांची पोलीस कोठडी एका दिवसाने तर तिचे सासरे आणि दीराची पोलीस कोठडी 31 मे पर्यंत वाढवण्यात आली. तर वैष्णवीच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना धमकावणारा आणि वैष्णवीच्या छळात सहभागी असलेला तिच्या नणंदेचा, करिश्माचा मित्र निलेश चव्हाण हाँ अद्यापही फरार असून त्याचया शोधासाठी पोलीसांची 6 पथकं पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान काल हगवणे कुटुंबाला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्या वकिलांनी अनेक युक्तिवाद केले. त्यामध्ये एक धक्कादायक विधानही त्यांनी केलं. वैष्णवीचा ज्यावेळी (16मे) मृत्यू झाला तेव्हा पाचही आरोपी (पती, नणंद, सासू, सासरे आणि दीर) हे घरातच नव्हते असा धक्कादायक दावा हगवणेंच्या वकिलांनी काल केला. एवढंच नव्हे तर वैष्णवीचं एका अज्ञात व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होतं, तिचे नको त्या व्यक्तीशी संबंध होते असा दावा केला. ज्याच्यासोबत तिचं चॅटिंग सुरू होतं असा दावा केला, ती व्यक्ती कोण याचा आता पिंपरी चिंचवड पोलिस तपास करण्याची शक्यता आहे.
दरम्यान वैष्णवीची नणंद करिश्मा हिचा मोबाईल हस्तगत न झाल्याने पोलिसांना तपासात अडथळा येत होता. त्याच मोबाईलच्या शोधासाठी पोलिसांनी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आरोपींनी लपवून ठेवलेला मोबाईल पोलिसांना आज मिळाला,सापडला तर अनेक प्रश्नांचा उलगडा होऊ शकतो.
तसेच या प्रकरणात सहआरोपी असलेल्या निलेश चव्हाण विरुद्ध स्टँटिंग वॉरंट जारी करण्यात आल्याने त्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्या संदर्भातील उद्घोषणा आज केली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. पुणे, मुंबईसह, गोवा, कर्नाटकमध्येही त्याचा शोध घेतला जात आहेत. पोलिसांच्या 6 पथकांकडून त्याच्यासंदर्भात अनेकांकडे चौकशी केली जात आहे.
कस्पटे परिवार चांदीची गौराई देतानाचा व्हिडीओ समोर
दरम्यान वैष्णवीच्या माहेरच्यांकडून, अर्थात कस्पटे परिवाराकडून हगवणेंना चांदीची गौराई देतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. लग्नात हुंड्यात कस्पटे परिवाराने 51 तोळे सोन्यासह साडेसात किलो चांदीची भांडी दिली होती. मात्र तरीही सणवारांदरम्यान त्यांनी पुन्हा हगवणे कुटुंबाला चांदीची गौराई दिली होती. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनीही या गोष्टीचा उल्लेख केला होता. आता तीच चांदीची गौराई देतानाचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात वैष्णवीच्या घरचे तिच्या सासरच्यांना अनेक वस्तू देतानाही दिसत आहेत.