AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagvane Case : मोठी अपडेट ! हगवणे प्रकरणात कोर्टाची बावधन पोलिसांना फटकार; काय केली विचारणा?

वैष्णवी हगवणे प्रकरणात पुणे कोर्टाने बावधन पोलिसांना फटकारले आहे. फरार आरोपींना मदत करणाऱ्यांना अटक करण्यावरून हा फटकार आहे. कोर्टाने नोटीस देण्याचा पर्याय असताना अटक का केली, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आरोपींना जामीन मिळाला आहे.

Vaishnavi Hagvane Case :  मोठी अपडेट ! हगवणे प्रकरणात कोर्टाची बावधन पोलिसांना फटकार; काय केली विचारणा?
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणImage Credit source: social media
| Updated on: May 28, 2025 | 1:35 PM
Share

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात पुणे कोर्टाने बावधन पोलिसांना तंबी दिली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या आरोपींना फरार झाल्यानंतर त्यांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. यावरून कोर्टाने पोलिसांना फटकार लगावली आहे. तुम्ही आरोपींना नोटीस पाठवू शकला असता. त्यांना अटक करण्याची गरज काय होती? असा सवाल करत कोर्टाने बावधन पोलिसांना फटकारलं आहे.

आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना त्यांना आश्रय देण्याच्या कारणावरून पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. या सर्वांना बाधवन पोलिसांनी कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हे पाचही जण बाहेर पडण्याआधी पुणे न्यायालयाने पोलिसांना तंबी दिली. सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्याची गरज नसून नोटीस देता येते. सदर गुन्ह्यात जामीन मिळू शकतो हे माहीत असतानाही अटक का केली? अशी विचारणा न्यायालयाकडून पोलिसांना करण्यात आली.

हगवणे बंधू अडचणीत

दरम्यान, हगवणे भावांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या दोघा भावांकडील पिस्तूल परवाण्याची चौकशी सुरू केली आहे. पिस्तुलाचा परवाना घेत असताना हगवणेने पुण्यातील रहिवाशी म्हणून पत्ते दिल्याचे समोर आले आहे. याची चौकशी झाल्यानंतर त्यात बेकायदेशीर काही आढळले तर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. राजेंद्र हगवणे यांचे कुटूंब मुळचे भूकुममधील आहे. ते राहण्यास बावधन परिसरात आहे. हगवणेचा कायमस्वरुपी निवासाचा पत्ता पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मात्र, त्यांनी पुण्यात निवास असल्याचे दाखवून पिस्तुल परवाना घेतला. त्यासोबतच निलेश चव्हाण यानेही पिस्तूल घेतले आहे. याप्रकरणाची पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

पिस्तुलाची गरज का पडली ?

हगवणे बंधुंनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यांतर्गत परवान्यासाठी अर्ज केला होता. नंतर पडताळणी करून त्यांना परवाना दिला गेला. यासाठी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून भाडेकरार दिल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. एकाच घरातील शशांक आणि सुशील यांना एकाच वेळी सुरक्षेसाठी पिस्तुलाची काय अवश्यकता निर्माण झाली? ते तत्कालीन पौड पोलिसांच्या हद्दीत राहत असूनही पुणे पोलीस आयुक्तालयातून पिस्तुल परवाना कसा घेतला? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.