Vaishnavi Hagwane: हगवणेला मदत करणाऱ्या काँग्रेस आमदाराच्या लेकाला अटक, काय आहे कनेक्शन?

वैष्णवी हगवणे प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये काँग्रेसमधील आमदाराच्या लेकाचा देखील समावेश आहे. आता त्याचे नेमके कनेक्शन काय? चला जाणून घेऊया...

Vaishnavi Hagwane: हगवणेला मदत करणाऱ्या काँग्रेस आमदाराच्या लेकाला अटक, काय आहे कनेक्शन?
Vaishnavi Hagavane
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 27, 2025 | 1:16 PM

हुंडाबळी वैष्णवी हगवणे प्रकरणारे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. या प्रकरणी रोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी बावधन येथून एका आमदाराच्या मुलाला अटक केली आहे. पण या आमदाराच्या मुलाचे या प्रकरणाशी काय कनेक्शन आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला जबाबदार असणारे तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे जवळपास आठ दिवस फरार होते. त्यांनी या आठ दिवसात अनेक ठिकाणं बदलली तसेच गाड्याही बदलल्या. या दोन्ही आरोपींनी आश्रय दिलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आज या पाचही जणांना न्यायलयात हजर करण्यात येणार आहे. यामधील एक आरोप काँग्रेस आमदाराचा लेक आहे. त्याने राजेंद्र आणि सुशील या दोन्ही आरोपींना लपण्यासाठी आश्रय दिला होता.
वाचा: हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करणाऱ्या हगवणेच्या संपत्तीचा आकडा ऐकलात का? बसेल धक्का

5 आरोपींना अटक

प्रीतम वीरकुमार पाटील (वय 47) कोगनोली, (तहसील चिकोडी) बेळगाम, कर्नाटक.
राहुल दशरथ जाधव (वय 45) पुसेगाव, खटाव, सातारा.
अमोल विजय जाधव (वय 35) पुसेगाव, खटाव, सातारा.
बंडू लक्ष्मण फटक (वय 55) लोणावळा.
मोहन उर्फ ​​बंडू उत्तम भेगडे, वय 60, वडगाव-मावळ.

आमदाराचा मुलगा कोण?

वैष्णवी हगवणे प्रकरणात अटक करण्यात आरोपींमध्ये काँग्रेसचे आमदरा वीरकुमार पाटील यांचा मुलगा आह. गेल्या कार्यकाळापर्यंत काँग्रसचे आमदार होते. 28 वर्षे काँग्रेसचे आमदार राहिलेले वीरकुमार पाटील हे ऊर्जामंत्री देखील होते.

वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी गुन्हा दाखल झालेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार असताना त्यांना मदत करणाऱ्या पाच आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामध्ये कर्नाटक राज्याचे काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम याचाही समावेश असणार आहे. दुसरीकडे पोलीस कोठडी संपलेल्या सासू नणंद आणि पतीची पोलीस कोठडी ही वाढवून घेण्यात पोलिसांना यश आला आहे. वैष्णवीला तिने आत्महत्या केलेल्या दिवशी हे प्रचंड मारहाण करत 15 जखमा केल्याचा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला होता तो ग्राह्य धरण्यात आल्याने तिघांची पोलीस कोठडी वाढली आहे. तर कस्पटे कुटुंबीयांना धमकावणारा निलेश चव्हाण याचाही पोलीस शोध घेत आहेत.