AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime | जमीन देत नसल्याच्या रागातून गावगुंडांची महिला व मुलींना मारहाण

गावगुंडांनी केलेल्या मारहाणीत महिला व मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र घटनेनंतरही गाव गुंडांवर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.सदार मारहाणीची प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्यात आला. पोलीस प्रशासनाने संबंधित घटनेची दाखल घेत गुंडांवर कारवाई करावी अशी मागणी जखमी महिलांनी केली आहे.

Pune crime | जमीन देत नसल्याच्या रागातून गावगुंडांची महिला व मुलींना मारहाण
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 7:21 PM
Share

पुणे- शहर व शहरपरिसात गेल्या काही काळापासून गाव गुंडाचा धुडगूस वाढला आहे. कधी हफ्त्यासाठी शस्त्राचा धाक दाखवत धमकव तर कधी फुकट जेवण दिले नाही म्हणून हॉटेलवर हल्ला कर यासारख्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच जमीन हडपण्यासाठी गावगुंडांकडून महिला व मुलींना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गावगुंडांनी केलेल्या मारहाणीत महिला व मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र घटनेनंतरही गाव गुंडांवर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.सदार मारहाणीची प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्यात आला. पोलीस प्रशासनाने संबंधित घटनेची दाखल घेत गुंडांवर कारवाई करावी अशी मागणी जखमीनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पीडित महिलेची जमीन खरेदी करण्याचा गाव गुंड प्रयत्न करत आहेत. मात्र पीडित महिलेने त्यांना कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. माझी जमीन विकायची नसल्याची माहितीही तिने गुंडाना दिली. तरी विविध प्रकारे सातत्याने त्रास दिला. तरी बधत नाही म्हटल्यावर तू जमीन कशी देत नाहीत ते बघतो असे म्हणत गुंडानी तिला मारहाण केली.

आठ वर्षाच्या मुलीसोबत गैरवर्तन दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात केश कर्तनालयात आठ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली असून ,मोहम्मद शेबू मोहम्मद हानिफ सलमानी (रा. चिखली) कारागिराला पोलिसांनी अटक केली आहे.  मुलगी आपल्या आजी सोबत केश कर्तनालयात केस कापण्यासाठी आली होती. मुलीचे केस कापताना केश कर्तनालयातील कारागिराने पीडितमुलीबरोबर अश्लील वर्तन केले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, फिजीओथोरेपी व्यवस्थित सुरु असल्याची दिली माहिती

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत काय भावना मांडल्या ?

Varsha Gaikwad | कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु होणार -वर्षा गायकवाड

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.