
पाटना : एक महिला नवऱ्याच्या अनुपस्थितीत तीन दिवसांपासून घरात एका युवकासोबत राहत होती. गावकऱ्यांनी तिला विचारलं, तेव्हा तिने सर्वांना हा माझा भाऊ आहे, म्हणून सांगितलं. सदर महिला घरात या युवकासोबत राहत होती. फारच कमीवेळा ती घराच्या बाहेर यायची. त्यावेळी गावकऱ्यांना तिच्यावर संशय आला. बिहारच्या बांकामधील हे प्रकरण आहे. नवऱ्याच्या अनुपस्थितीत या महिलेने एका युवकाला आपल्या घरी बोलावलं होतं. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांना सांगितलं की, घरी आलेला युवक तिचा भाऊ आहे. त्यानंतर दोघे एकत्र घरी रहायचे. फारसे दोघे बाहेर दिसत नव्हते. त्यावेळी आसपासच्या काही लोकांना संशय आला. त्यांनी महिलेच्या घरावर छापा मारला. त्यावेळी दोघांना रंगेहाथ पकडलं.
गावकरी अचानक त्या महिलेच्या घरात घुसले. त्यावेळी सदर महिलेला युवकासोबत नको त्या अवस्थेत पकडलं. याच युवकाला ती आपला भाऊ म्हणून सांगत होती. गावकऱ्यांनी दोघांना आपत्तीजनक अवस्थेत पकडलं. त्यानंतर त्यांनी महिलेला कपडे घालू दिले. युवकाला त्याच अवस्थेत पकडलं. एका खांबाला बांधून बेदम मारहाण केली. गावकरी युवकाला मारहाण करत होते. त्यावेळी महिला त्याला वाचण्यासाठी मध्ये आली. मारहाणीपासून ती बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. महिलेचा पती बाहेर दुसऱ्याठिकाणी नोकरीला आहे. अमरपुर पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे.
पोलिसांनी या प्रकरणात काय केलं?
गावकऱ्यांनी सांगितलं की, “युवक तीन दिवसांपासून महिलेसोबत तिच्या घरी राहत होता. लोकांनी विचारल तेव्हा तिने भाऊ म्हणून सांगितलं. पण त्या युवकासोबतच नको त्या अवस्थेत पकडलं” कुटुंबाच्या पालनपोषणासाठी महिलेचा नवरा बाहेर असतो. पत्नी इथे चुकीच काम करत होती. महिलेच्या प्रियकराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात ती गावकऱ्यांपासून प्रियकराचा बचाव करताना दिसतेय. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यांनी युवकाची सुटका केली व दोघांना घेऊ पोलीस ठाण्यात गेले. कोणीही या प्रकरणात तक्रार नोंदवलेली नाही. पोलिसांनी बाँड लिहून घेतला व दोघांची सुटका केली.