Wardha Crime : ‘तुझं लग्न दुसरीकडे कसं होतं ते बघतेच मी’ प्रेयसीच्या धमकीला घाबरुन प्रियकराची आत्महत्या

Wardha Crime : प्रेयसी आणि तिच्या मित्राच्या सततच्या तगाद्यामुळे हताश आणि निराश झालेल्या आशिष भोपळेनं जीव दिला. सावंगी पोलीस स्टेशन हद्दीतील मांडवा शिवारात एका नाल्यातील झाडाला गळफास घेत त्यानं आत्महत्या करुन जीवन संपविले.

Wardha Crime : तुझं लग्न दुसरीकडे कसं होतं ते बघतेच मी प्रेयसीच्या धमकीला घाबरुन प्रियकराची आत्महत्या
प्रियकराची आत्महत्या
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 8:55 AM

वर्धा : वर्ध्यामध्ये (Wardha Crime) प्रेयसीच्या धमकीला घाबरुन प्रियकराने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना वर्ध्यातील सावंगी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. ‘तुझे लग्न दुसरीकडे कसे होते ते मी बघते, दोन लाख रुपये दे! न दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयाला ठार मारेन आणि तुला पोलीस केस मध्ये फसवेन’ अशी धमकी प्रेयसीने आपल्या प्रियकराला (Girl friend threaten boyfriend) दिली होती. प्रेयसीसोबत तिच्या सहकाऱ्यांनीही तरुणाला धमकावलं होतं. सततच्या धमक्या आणि जाचाला कंटाळून अखेर तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येनं तरुणाच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतलाय. सावंगी पोलीस (Wardha News) या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आत्महत्या करणारा तरुण कोण?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आशिष नरेश भोपळे असं असून तो विरुळ आकाजी इथं राहायला होता. मांडवा शिवारात असलेल्या नाल्यातील झाडाला गळफास घेत आशिषने आत्महत्या केलीय. आशिषने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुसाईड नोट हाती लागल्यानंतर आशिषची आई सुनंदा नरेश भोपळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन सावंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय.

आत्महत्या करणारा तरुण आशिष

प्रेयसीची धमकी..

मृतक आशिष भोपळे आणि आरोपी पारबता कुंभेकर (रा. कृष्णापूर ता. आर्वी) यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायची. ‘तुझे लग्न कसे होते मी बघते’, अशी धमकी देऊन आशिषकडून वारंवार दोन लाख रुपयांची मागणी केली जात होती. पैसे देण्यास नकार दिल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जिवे मारुन, तुला पोलीस केसमध्ये फसवेन, अशी धमकी आशिषला देण्यात आली होती.

प्रेयसी आणि तिच्या मित्राच्या सततच्या तगाद्यामुळे हताश आणि निराश झालेल्या आशिष भोपळेनं जीव दिला. सावंगी पोलीस स्टेशन हद्दीतील मांडवा शिवारात एका नाल्यातील झाडाला गळफास घेत त्यानं आत्महत्या करुन जीवन संपविले.

पाहा व्हिडीओ :

या प्रकरणाची तक्रार दाखल होताच सावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करता तपासाला सुरवात केलीय. या घटनेमुळे आशिषच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.