इतका उशीर का झाला ? पत्नीने पतीला केला सवाल,नंतर पत्नीने जे केले ते भयानक
पोलीसांनी सांगितले की पीडित सत्यम पावडर फर्मचा मालक आहे. लग्नाला दहा वर्षे झाले तरी त्याची पत्नी त्याच्यावर संशय घेत असते. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा भांडणे होत असतात.

पती आणि पत्नी यांचं नातं विश्वासावर आधारित असते. या नात्यात थोडी नोक झोक सुरुच असते. परंतू या नात्यात जर संशयाने जागा घेतली तर संसाराची राखरांगोळी व्हायला वेळ लागत नाही. अशाच एका संशयाने पछाडलेल्या पत्नीने पती रात्री उशीरा घरी आल्याने त्याच्यावर दारातच प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर जे झाले त्याने त्यांच्या संसाराची चांगलीच धुळधाळ उडाली.
पती आणि पत्नी ही एका संसाराच्या गाडीची दोन चाक असतात. दोघांनी मिळून हा संसाराचा गाडा चालवायचा असतो. परंतू या नात्यात जर संशयाचा भुंगा शिरला तर हे नातं काचेच्या भांड्या सारखे फुटून त्याचे तुकडे होतात.अशा एका मध्य प्रदेशातील जोडप्याच्या घरातील ही खळबळजनक घटना आहे. त्या रात्री घरी उशीरा आल्याचे निमित्त झाले आणि दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली.
या दोघांचा विवाह १० वर्षांपूर्वी झाला होता. त्या रात्री पती उशीरा घरी आला, त्यामुळे पत्नीने त्याला रागाने विचारले की इतका उशीर का झाला. त्यानंतर त्याने दिलेल्या उत्तराने समाधान न झालेल्या पत्नीने त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली त्यात पत्नीने पतीचे नाकच चावल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत व्यापारी असलेला पती पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. पती म्हणाला की आमच्या लग्नाला दहा वर्षे झालेली आहे. परंतू पत्नी माझ्यावर कायम संशय घेत राहीली आहे. त्यामुळे आमच्या नेहमीच भांडणे होत असतात. माझे कोणाशीही संबंध नाहीत, परंतू पत्नी काही ऐकायला तयार नाही.
दातांनी पतीचे नाक तोडले
सोमवारी रात्री पती कामामुळे रात्री घरी पोहचला होता.त्यावरुन दोघांमध्ये भांडण झाले. पत्नीच्या प्रश्नाला उत्तर न देता पती शांत बसल्याने पत्नीला आणखीनच राग आला. त्यानंतर दोघामध्ये मोठे भांडण झाले. वाद इतका वाढला की दोघांमध्ये चांगलीच मारहाण झाली. याच दरम्यान रागाने पत्नीने पतीच्या नाकाचा इतका मोठ्याने चावा घेतला की नाकाचा तुकडाच पडला आणि पती गंभीररित्या जखमी झाला.
हॉस्पिटलमध्ये दाखल
जखमी अवस्थेत पती बजरिया पोलीस ठाण्यात पोहचला. त्यानंतर पोलीसांना फिर्याद दिली. त्यानंतर पोलीसांनी पत्नी विरोधात केस दाखल केली. आणि पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
