चिकन बनवण्यास सांगितले, शाकाहारी पत्नीने दिला नकार,नंतर जे घडले ते भयंकर

नुकताच विवाह झालेली रीना तिच्या नव्या संसाराची स्वप्ने पहात होती आणि एकेरात्री तिचा पती घरात चिकन घेऊन आला. यावरुन दोघांत प्रचंड वाद झाला..

चिकन बनवण्यास सांगितले, शाकाहारी पत्नीने दिला नकार,नंतर जे घडले ते भयंकर
| Updated on: Sep 12, 2025 | 9:01 PM

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका २१ वर्षीय तरुणीचा विवाह दहा महिन्यांपूर्वीच झाला होता. लग्नानंतर सर्वकाही सुरळीत सुरु असताना एका रात्री तिचा पती घरात चिकन घेऊन आला आणि त्याने बायकोला चिकन तयार करायला सांगितले. त्यानंतर त्याची बायको त्याच्यावर इतकी रागावली की तिने धक्कादायक पाऊल उचलले.

रीना हीचा विवाह निगम याच्याशी होऊन दहा महिने देखील झाले नव्हते. दोघांचे लग्न होऊन सर्वकाही गोडीगुलाबीने सुरु होते. परंतू २० ऑगस्टच्या रात्री छोट्या कारणावरुन दोघांमध्ये प्रचंड भांडण झाले. त्या रात्री निगम यांनी घरात कोंबडा आणला आणि त्यास शिजवण्याच्या तयारीत होता. रीना हिला हे पसंद नव्हते. तिने घरात मासांहार शिजवू नको अशी विनंती केली. परंतू निगम याने तिचे ऐकले नाही. त्यावरुन त्यांच्यात जोरदार भांडणे झाले. निगम याने जिद्दीने कोंबड्याचे मटण शिजवले. रीना हीला ही गोष्ट इतकी वाईट वाटली की तिने दुखी होऊन घरात गळफास लावून जीवनच संपवले.

गंगा नदीत टाकले

यानंतर आणखीनच धक्कादायक प्रकार घडला. निगम आणि त्याच्या कुटुंबाने पोलिसांच्या चौकशी पासून वाचण्यासाठी रीनाचा मृतदेह कपड्यात गुंडाळून गावासमोरी गंगा नदीत टाकून दिला. हे सर्व काही गुपचूप केल्याने कोणालाही काही कळले नाही. निगमने पोलिसांत रीना बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून टाकली. त्यामुळे कोणालाही संशय येणार नाही असे त्याला वाटले. परंतू रीनाच्या माहेरच्या लोकांना संशय आला. त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत निगम याने अखेर सत्य सांगून टाकले.

पोलिसांनी तातडीने कारवाई सुरु केली. निगम आणि त्याची आई, वडील आणि भाऊ, चुलत भावांविरोधात गुन्हा दाखल हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी तिघा आरोपींना अटक केली आणि गंगा नदीत रीना हीचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली आहे.अनेक तास शोधाशोध करुनही रीना हिचा काही थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे.