सेक्सवर्धक गोळ्या खाऊन नवरा सतत हैराण करायचा, अखेर एक दिवस बायकोने प्रेमाने हळदीचं दूध प्यायला लावलं आणि…

हैदर अली 39 वर्षांचा होता. तो मुंबईत मुजरीची काम करायचा. त्याचं कुटुंब सूरतला राहतं. हैदर अली महिनाभार मुंबईत रहायचा. मग घरी आला की, सेक्सवर्धक गोळ्या खाऊन पत्नीला हैराण करायचा.

सेक्सवर्धक गोळ्या खाऊन नवरा सतत हैराण करायचा, अखेर एक दिवस बायकोने प्रेमाने हळदीचं दूध प्यायला लावलं आणि...
Ishrat Khatun
| Updated on: Jan 28, 2026 | 8:47 AM

गुजरातच्या सूरत शहरात लिंबायत भागात एक गंभीर हत्येचं प्रकरण समोर आलय. एका पत्नीने पती हैदर अलीची हत्या केली. या हत्येचं प्लानिंग पत्नीने केलं होतं. पोलिसांनुसार, पत्नीने हळदीच्या दुधार उंदीर मारण्याचं औषध मिसळून ते दूध पती हैदर अलीला प्यायला दिलं. काही दिवस तिने असं करुन बघितलं. पण काही उपयोग झाला नाही. पती जिवंत होता. अखेर तिने गळा दाबून त्याची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी पत्नी इशरत जहां ऊर्फ इशरत खातूनला अटक केली आहे. चौकशीत तिने सांगितलं की, पती हैदर अली मुंबईत नोकरीला होता. जेव्हा तो सूरतला घरी यायचा. तेव्हा सेक्सवर्धक गोळ्या खाऊन शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. या यातनांना ती कंटाळली होती. त्याच्या या सवयीला कंटाळून इशरतने हैदर अलीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला.

1 जानेवारी 2026 च्या रात्री इशरतने हैदर अलीला पिण्यासाठी हळद मिसळलेलं दूध दिलं. त्यात तिने उंदीर मारण्याचं औषध मिसळलेलं. सुरुवातीला औषधांचा परिणाम फारसा होताना दिसला नाही. पण 5 जानेवारीला त्याची तब्येत अचानक बिघडली. त्याला तात्काळ स्मीमेर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आधी इशरतच्या कुटुंबाने सांगितलं की, हा मृत्यू कुठल्या तरी सामान्य आजारामुळे झालाय.

दफनविधीच्या वादामुळे संशय बळावला

हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह घरी आणला. हैदर अलीच्या भावाची इच्छा त्याचा दफनविधी बिहारमधील चंपारण स्थित त्यांच्या मूळ गावी व्हावा अशी इच्छा होती. पण पत्नीने दफनविधी सूरतमध्येच होईल असं ठणकावून सांगितलं. या वादामध्ये भावाला संशय आला की, हैदर अलीच्या मृत्यूमध्ये त्याच्या पत्नीचा हात असू शकतो. त्यानंतर त्याने या बद्दल पोलिसांना कळवलं.

पोस्टमार्टम रिपोर्टमधून काय समोर आलं?

पोलिसांनी मृतदेहाचं फॉरेन्सिक पोस्टमार्टम केलं. पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, हैदर अलीचा मृत्यू केवळ विषाने झाला नव्हता. मृतकाची मात आणि छातीवर दाब टाकल्यामुळे श्वास कोंडला गेल्याने मृत्यू झालाय असं रिपोर्टमध्ये म्हटलेलं. इशरतने पोलिसांसमोर कबुली दिली की, विषाचा परिणाम सुरु झाल्यावर पती कमजोर झाला. त्यावेळी तिने त्याच्या गळा आणि छातीवर दाब टाकून ही हत्या केली.

तो वारंवार सेक्सवर्धक गोळ्या खाऊन त्रास द्यायचा

पतीकडून होणारा त्रास आणि क्रूरता सहन करण्यापलीकडे गेली होती. तो वारंवार सेक्सवर्धक गोळ्या खाऊन त्रास द्यायचा आणि मारायचा. त्यावेळी तिने नवऱ्याला कायमचं संपवून टाकायचं असं ठरवलं. सुरुवातीला तिने विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तो जिवंत राहीला. त्यावेळी तिने गळा आणि छाती दाबून त्याला संपवलं असं इशरतने पोलिसांना सांगितलं.