AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Extramarital Affair : अनैतिक संबंध जुळल्यानंतर पत्नीला रहावेना, मग तिने नवऱ्याला हटवण्यासाठी रचलं भयंकर कारस्थान

Extramarital Affair : प्रियाची वर्षभरापूर्वी बॅग बनवणाऱ्या योगेंद्र बरोबर ओळख झाली होती. बॅग बनवता बनवता योगेंद्रचा प्रियासोबत रोमान्स सुरु झाला. योगेंद्र बॅग बनवायचं काम करतो.

Extramarital Affair : अनैतिक संबंध जुळल्यानंतर पत्नीला रहावेना, मग तिने नवऱ्याला हटवण्यासाठी रचलं भयंकर कारस्थान
Crime News
| Updated on: Jan 24, 2026 | 4:05 PM
Share

पतीची हत्या करणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी मिळून प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची गोळी झाडून हत्या केली. बेला पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. पोलिसांनी एसओजी आणि सर्विलांसच्या मदतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला तिर्वा रोज बॉर्डर बॅरियरजवळ अटक केली. उत्तर प्रदेश औरैया पोलिसांनी ही कारवाई केली. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी पत्नी प्रिया आणि तिचा प्रियकर योगेन्द्र शाक्य उर्फ पप्पूला अटक केली. मी प्रियाच्या सांगण्यावरुन अरविंदची हत्या केली असं पोलीस चौकशीत योगेंद्रने सांगितलं. प्रिया आणि योगेंद्रने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्यामध्ये वापरलेला तमंचा ताब्यात घेतला.

औरैयाच्या बेला पोलीस ठाण्याला 17 जानेवारीला पोलीस कंट्रोल रुमला हत्या झाल्याची सूचना मिळाली. मंडी रोड येथील एका घरात अज्ञाताने एका व्यक्तीची हत्या केली आहे. माहिती मिळताच बेला ठाण्याचे पोलीस फॉरेन्सिक टीम आणि अधिकाऱ्यांसाठी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यासाठी पथकं रवाना केली.

बॅग बनवायचं काम करायचा

बेला पोलीस, एसओजी आणि सर्विलांसच्या संयुक्त टीमने या प्रकरणात खुलासा करताना दोन आरोपींना पकडलं. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तमंचा 315 बोर, खोखा काडतूस आणि दोन मोबाइल फोन जप्त केले. पती अरविंद प्रेमसंबंधात अडथळा ठरत होता. म्हणून पत्नी प्रियाने प्रियकर योगेंद्रच्या मदतीने घरातच गोळी मारुन पतीची हत्या केली. योगेंद्र बॅग बनवायचं काम करतो.

बॅग बनवता बनवता योगेंद्रचा प्रियासोबत रोमान्स सुरु झाला

मृत अरविंदची पत्नी प्रियाची वर्षभरापूर्वी बॅग बनवणाऱ्या योगेंद्र बरोबर ओळख झाली होती. बॅग बनवता बनवता योगेंद्रचा प्रियासोबत रोमान्स सुरु झाला. अरविंदला या बद्दल समजल्यानंतर त्याने विरोध केला. त्यानंतर प्रियाने एक कारस्थान रचलं. प्रियकर योगेंद्रच्या साथीने नवरा अरविंदला मार्गातून हटवलं. सध्या विवाहबाह्य संबंधातून समाजात गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं आहे.  आता आणखी एक गुन्हा उघड झालाय.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.