Team India : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईकर खेळाडू कॅप्टन, पाकिस्तान विरुद्ध या तारखेला भिडणार
India vs Pakistan A Women Asia Cup 2026 : निवड समितीने वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेसाठी मुंबईकर राधा यादव हीच्याकडे कर्णधारपदाची सूत्र दिली आहेत. पाहा भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळाली.

मेन्स टीम इंडिया सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2 सामन्यांनंतर 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला महिला खेळाडू या वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात खेळत आहेत. आरसीबीने या स्पर्धेतील प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. तर इतर संघांमध्ये एका स्थानासाठी चुरस पाहायला मिळत आहे. अशात आता बीसीसीआय निवड समितीने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने आगामी आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
मुंबईकर राधा यादवकडे नेतृत्वाची धुरा
बीसीसीआयने वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेसाठी इंडिया ए टीम जाहीर केली आहे. निवड समितीने या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निवड समितीने या स्पर्धेसाठी भारताच्या मुख्य संघातील खेळाडूंनाही संधी दिली आहे. मुंबईकर राधा यादव या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे. त्या व्यतिरिक्त तेजल हसनबीस, मिन्नू मणी आणि साइमा ठाकोर यासारख्या मुख्य संघातील खेळाडूंचा या स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला आहे.
आशिया कपबाबत महत्त्वाची माहिती
आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत एकूण 8 संघ भिडणार आहेत. या स्पर्धेचा थरार 13 ते 22 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. या 8 संघांना 4-4 नुसार ए आणि बी अशा 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 15 सामन्यानंतर विजेता निश्चित होणार आहे.तसेच प्रत्येक संघाला साखळी फेरीत 3 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. इंडिया ए टीमचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतासह या ग्रुपमध्ये पाकिस्तान वूमन्स ए, यूएई आणि नेपाळ महिला संघाचा समावेश आहे.
आशिया कप स्पर्धसाठी निवड समितीकडून कुणाला संधी?
🚨 News 🚨#TeamIndia’s squad for Test against Australia Women & India A squad for ACC Rising Stars Asia Cup announced.
Details 🔽 | #AUSvIND https://t.co/F8AyqxIFhn
— BCCI Women (@BCCIWomen) January 24, 2026
इंडिया ए वूमन्स टीमचं वेळापत्रक
विरुद्ध यूएई वूमन्स, 13 फेब्रुवारी
विरुद्ध पाकिस्तान वूमन्स ए, 15 फेब्रुवारी
विरुद्ध नेपाळ वूमन्स, 17 फेब्रुवारी
आशिया कप 2026 स्पर्धेसाठी वुमन्स इंडिया ए टीम : राधा यादव (कर्णधार), हुमैरा काझी, वृंदा दिनेश, अनुष्का शर्मा, दीया यादव (फिटनेसवर अवलंबून), तेजल हसनबीस, नंदनी कश्यप (विकेटकीपर), ममता एम (विकेटकीपर), सोनिया मेंढिया, मिन्नू मणी, तनुजा कंवर, प्रेमा रावत, साइमा ठाकोर, जिंतमणि कलीता आणि नंदनी शर्मा.
