Asha Bhosle Passed Away | आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज म्हणजे…
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. यावर जेष्ठ नेते अशोक सराफ हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. यावर जेष्ठ नेते अशोक सराफ हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी तमाशा चित्रपटातील गाण्याच्या शुटींगचा अविस्मरणीय किस्सा सांगत आशाजींच्या आठवणींना उजाळा दिला, पुढे ते म्हणाले, ‘आमची भेट कधी व्हायची नाही. कारण क्षेत्र वेगळी होती. पण जसा मी त्यांचा जबरदस्त फॅन होतो. आता देखील आहे.. तशा त्याही माझ्या होत्या… ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे… त्यांचा आवाज म्हणजे असा आवज परत होणे नाही… असं म्हणत अभिनेते अशोक सराफ यांनी आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा दिला.’
शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशा भोसले यांच्या निधनाचं कारण सांगितलं. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
Published on: Apr 12, 2026 02:35 PM
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना

