Devendra Fadnavis | सुरांचा अमर आवाज हरपला… आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भावनिक वक्तव्य
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. पुढे ते म्हणाले, ‘आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.’
शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशा भोसले यांच्या निधनाचं कारण सांगितलं. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
Published on: Apr 12, 2026 01:52 PM
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय

