AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोटोरोलाच्या ‘या’ अप्रतिम फोनमध्ये चार 50MP कॅमेरे आणि 5200mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत

मोटोरोला हा चार 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर्स असलेला एक प्रीमियम फोन आहे. तर या फोनमध्ये कोणते फिचर्स आहेत आणि त्याची किंमत किती आहे? चला सविस्तरपणे आजच्या लेखात जाणून घेऊयात.

मोटोरोलाच्या 'या' अप्रतिम फोनमध्ये चार 50MP कॅमेरे आणि 5200mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत
Motorola Signature
| Edited By: | Updated on: Apr 12, 2026 | 3:53 PM
Share

भारतीय बाजारात रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. प्रत्येक कंपनी ग्राहकांच्या गरजेप्रमाणे तर त्यांच्या आधीच्या फोनचा सक्सेसर म्हणून नवीन फोन बाजारात सादर करत असतात. अशातच एक असा मोबाईल फोनबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एक, दोन किंवा तीन नव्हे, तर तब्बल चार 50-मेगापिक्सेलचे कॅमेरा सेन्सर्स आहेत. तर हा मोटोरोला कंपनीचा सिग्नेचर स्मार्टफोन आहे. जो मोटोरोलाचा फ्लॅगशिप फोन असून, तो केवळ एकच नव्हे, तर अनेक प्रभावी आणि पॉवरफूल फिचर्स देतो. चार 50-मेगापिक्सेल कॅमेऱ्यांव्यतिरिक्त, हा फोन आणखी कोणते फिचर्स देतो आणि या हँडसेटची किंमत किती आहे? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

भारतात मोटोरोला सिग्नेचरची किंमत

या प्रीमियम फोनची किंमत 12GB/256GB व्हेरिएंटसाठी 59 हजार 999 रूपये आहे. तर 16GB/512GB व्हेरिएंटसाठी 64 हजार 999 आणि 16GB/1TB व्हेरिएंटसाठी 69 हजार 999 रूपये आहे. हस फोन खरेदी करताना तुम्ही जर ICICI, Axis, HDFC किंवा SBI बँक कार्ड वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला 7,500 ची सूट मिळेल. या किंमत श्रेणीमध्ये हा फोन OPPO Reno15 Pro Mini 5G, vivo V70 Elite आणि OPPO Reno13 Pro 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो.

मोटोरोला सिग्नेचर स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन: या फोनमध्ये 6.8-इंचाचा सुपर एचडी एलटीपीओ एक्सट्रीम अमोलेड डिस्प्ले असून त्याची कमाल ब्राइटनेस 6200 निट्सपर्यंत आहे. यात 165Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट, HDR10+ आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट आहे.

प्रोसेसर: या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 व्या पिढीचा 5 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.

कॅमेरा: मागील बाजूस OIS सह 50 मेगापिक्सेलचा सोनी LYT 828 प्रायमरी सेन्सर, सोबतच 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50 मेगापिक्सेलचा सोनी LYT 600 पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर आहे. सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेलचा सोनी LYT 500 फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन 100x हायब्रिड झूम आणि 3x ऑप्टिकल झूमला देखील सपोर्ट करतो.

बॅटरी: 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह पॉवरफूल 5200mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंग, 5W वायर्ड रिव्हर्स चार्जिंग आणि 10W वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील आहे.

कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये Wi-Fi 7, 5G, ब्लूटूथ व्हर्जन 6 आणि एक USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक