AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delimitation Bill : तुमच्या सुनील तटकरेंनी… डिलिमिटेशनवरुन तटकरेंचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

डिलिमिटेशन विधेयकावर उद्या संसदेत होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान सुनील तटकरे यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

Delimitation Bill : तुमच्या सुनील तटकरेंनी... डिलिमिटेशनवरुन तटकरेंचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Sunil Tatkare Statement,Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 29, 2026 | 11:42 PM
Share

डिलिमिटेशन विधेयकावर उद्या संसदेत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असताना खासदार सुनील तटकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. उद्या नेमकं काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असतानाच तटकरे यांनी आपल्या भाषणातून एक महत्त्वाचा दावा केला आहे. ‘उद्या जे काही घडणार आहे, त्यामध्ये छोटीशी का होईना, पण भूमिका तुमच्या सुनील तटकरे यांनी बजावलेली आहे,’ असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

उद्याच्या घडामोडींमध्ये तटकरे यांची भूमिका काय?

संसदेत उद्या डिलिमिटेशन विधेयकासंदर्भात घडामोडी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. उद्या होणाऱ्या घडामोडींमध्ये आपलीही भूमिका असेल, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. ‘छोटीशी का होईना, भूमिका तुमच्या सुनील तटकरे यांनी बजावलेली आहे, हे महाराष्ट्रात आणि देशात निश्चितच पाहायला मिळेल,’ असं तटकरे म्हणाले.

तटकरे यांच्या या विधानामुळे उद्या संसदेत नेमकं काय घडणार आणि त्यात त्यांची भूमिका काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, आपल्या भूमिकेचा नेमका तपशील त्यांनी या भाषणात स्पष्ट केलेला नाही.

‘द्रमुक’ ‘बीआरएस’चाही पाठिंबा

इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या द्रमुकने घटनादुरुस्ती विधेयकाला शनिवारी अधिकृतपणे पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंब्याचे संकेत दिले आहेत. भारत राष्ट्र समितीनेही घटनादुरुस्ती विधेयकाचे समर्थन केले आहे. या पक्षाचा लोकसभेत खासदार नसला तरी राज्यसभेत ३ सदस्य आहेत. वायएसआर काँग्रेसही पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकाली दल ‘एनडीए’चा भाग बनल्यामुळे एकमेव खासदार हरसिमतर कौर बादल यादेखील विधेयकाच्या बाजूने मतदान करू शकतील. ‘आप’चे 3 खासदार लोकसभेत असून त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही.

दुसरीकडे आज राहुल गांधी यांनी द्रमुख प्रमुख एम के स्टॅलिन यांची भेट घेतली. त्याशिवाय शरद पवारांना भेटण्यासाठी राहुल गांधी मुंबईतही दाखल झाले. आमची चर्चा सुरु आहे. पवार इंडिया आघाडीला अनुकूल निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा