Raja Raghuvanshi Murder : भांगेत राजाच्या नावाने सिंदूर लावणारी सोनम बेवफा निघाली, तिच्या आईची पहिली प्रतिक्रिया काय?
Raja Raghuvanshi Murder : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. सगळ्या देशाला या घटनेने हादरवून सोडलय. राजाच्या नावाने सिंदूर सजवणारी सोनमच बेवफा निघाली. एक नवविवाहित नवरीने खतरनाक प्लान बनवला. यावर सोनमची आई सुद्धा व्यक्त झाली आहे.

इंदूरची सोनम…तिने 28 दिवसांपूर्वी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सात फेरे घेतले. डोक्यात राजाच्या नावाने सिंदूर सजवलं. व्रत ठेवलं. त्यानंतर 20 मे रोजी पती राजा रघुवंशीसोबत हनिमूनला शिलॉन्ग येथे गेली. मात्र, तिथून जी बातमी आली, त्याने सगळ्या देशाला हादरवून सोडलं. राजाचा मृतदेह खोल दरीत सापडला. सोनम बेपत्ता होती. आता 17 दिवसानंतर स्टोरीमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलाय. सोनम जिवंत सापडली. यूपीच्या गाजीपूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तिने केलेल्या खुलाशांनी सगळ्यांनाच धक्का बसलाय.
सूत्रांच्या माहितीनुसार, सोनमच आधी दुसऱ्या युवकासोबत अफेयर होतं. त्याचमुळे तिने पती राजाच्या हत्येच कारस्थान रचलं. राजाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शिलॉन्गला घेऊन गेली. तिथे सुनियोजित पद्धतीने त्याची हत्या केली.
सोनमच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा का?
9 जूनच्या सकाळी 3 ते 4 दरम्यान सोनम गाजीपूरच्या नंदगंज भागात एका ढाब्यावर पोहोचली. तिने ढाबा मालकाकडून फोन घेऊन भावाला फोन केला. त्याला सांगितलं ती गाजीपूरमध्ये आहे. भावाने तात्काळ इंदूर पोलिसांना कळवलं. त्यांनी गाजीपूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सोनमला वन स्टॉप मेडीकल येथे तपासणीसाठी ठेवलं. तपासात तिच्या शरीरावर मारहाणीच्या कुठल्याही जखमा नाहीत.
राजाला मार्गातून हटवण्याचा प्लान
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमच दुसऱ्या युवकासोबत प्रेम संबंध होते. लग्नाआधीपासून हे प्रेम प्रकरण सुरु होतं. लग्नानंतरही दोघे संपर्कात होते. सोनमने राजाला मार्गातून हटवण्याचा प्लान बनवला. प्रियकरासोबत मिळून तिने शिलॉन्ग येथे हत्येचा कट प्रत्यक्षात आणला. राजाच्या हत्येमध्ये एकूण चार जण होते. यात तीन इंदूरचे आणि एक यूपीचा आहे. तिघांना इंदूरमध्ये पकडण्यात आलं. चौथा उत्तर प्रदेशचा फरार आहे. मेघालयचे डीजीपी एल. नोंग्रांग यांनी सांगितलं की, सोनमसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
सोनमच्या आईची प्रतिक्रिया काय?
सोनमची आई संगीताची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका न्यूज एजन्सीशी बोलताना संगीता म्हणाल्या की, “सोनम सापडली, त्या बद्दल धन्यावद. हे सुद्धा दु:ख आहे, ते सुद्धा दु:ख आहे. अजून राजाच्या मारेकऱ्याचा शोध लागायचा आहे” संगीता म्हणाली की, “काय चूक? काय बरोबर? हे तपासातून समोर येईल. मी काय सांगू? मुलगी मिळाली पण सत्य काय आहे? आता पु़ढच्या गोष्टींचा आम्हाला सामना करावा लागेल” इंदूर पोलिसांसह शिलॉन्ग पोलीस गाजीपूरला पोहोचत आहेत.
