केस पकडून आपटलं, लाथा-बुक्क्यांनी तुडवलं…विरारमध्ये अर्धनग्न इसमाची महिला-मुलीला अमानुष मारहाण !

किरकोळ कारणावरून एका अर्धनग्न पुरूषाने आई-मुलीला बेदम मारहाण केल्याचा भयानक प्रकार समोर आला असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. दरवाड्यावर खिळा ठोकण्याच्या मुद्यावरून झालेला वाद पेटला आणि त्यानतंर एकच रणकंदन माजलं.

केस पकडून आपटलं, लाथा-बुक्क्यांनी तुडवलं...विरारमध्ये अर्धनग्न इसमाची महिला-मुलीला अमानुष मारहाण !
विरारमध्ये महिलेला लाथाबुक्क्यांनी तुडवलं
| Updated on: Nov 28, 2024 | 12:49 PM

मुंबईत सध्या गुन्ह्यांच्या, हाणामारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. त्यातच आता विरारमध्ये एक भयानक, क्रूर घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून एका अर्धनग्न पुरूषाने आई-मुलीला बेदम मारहाण केल्याचा भयानक प्रकार समोर आला असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. दरवाड्यावर खिळा ठोकण्याच्या मुद्यावरून झालेला वाद पेटला आणि त्यानतंर एकच रणकंदन माजलं. संतापलेल्या पुरूषाने त्या महिलेचे केस पकडून तिला ठोसे, बुक्के मारत अमानुष मारहाण केली. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर विरार पोलिसांनी मारहाण करणारा पुरूष आणि तयाची पत्नी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेच्या विवा जहागीड कॉम्प्लेक्स तुलसीधाम सोसायटीत हा भयाक प्रकार घडला. त्या सोासायटीमधील तिसऱ्या मजल्यावरील रुम नंबर 302 मध्ये रात्री 9.45 सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. गौतम पांडे असे आरोपीचे नाव असून प्रतिभा असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.तर निशा धुरी असे पीडित महिलेचे नाव असून ती व तिची मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गौतम आणि पीडित महिला हे दोघेही एकाच इमारतीत शेजारी-शेजारी राहतात.

घटनेच्या दिवशी दरवाजावर खिळा ठोकण्याच्या मुद्यावरून त्या दोघांमध्ये काही वाद झाला. मात्र बघता बघता ते भांडण चांगलचं पेटलं. त्यानंतर अर्धनग्न अवस्थेतील गौतम यांनी व त्यांच्या पत्नीने निशा व त्यांच्या मुलीला मारहाण केली. त्यांचे केस पकडून अक्षरश: ठोसे-बुक्के मारत पीडित महिला व तिच्या मुलीला मारहाण करण्यात आली. तेथील सीसीटीव्ही मध्ये मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

या संदर्भात पीडित महिलेने विरार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर विरार पोलीस ठाण्यात कलम 74,115,(2),, 352,351(2) महिलेला मारहाण करून विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विरार पोलिसांनी पती पत्नीला ताब्यात घेतलं असून ते पुढील तपास करत आहेत.