AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारळ पाणी आणि ताक; कडाक्याच्या उन्हात शरीरासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानापासून संरक्षण मिळवण्यासाठी नारळ पाणी आणि ताक यांपैकी कोणते पेय अधिक प्रभावी आहे? वाचा सविस्तर माहिती

| Updated on: Mar 15, 2026 | 2:40 PM
Share
मार्च महिना सुरू होताच उन्हाचा चटका वाढू लागला आहे. अशा कडाक्याच्या उन्हात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवू लागतो. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी बाजारात शीतपेयांची मागणी वाढते.

मार्च महिना सुरू होताच उन्हाचा चटका वाढू लागला आहे. अशा कडाक्याच्या उन्हात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवू लागतो. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी बाजारात शीतपेयांची मागणी वाढते.

1 / 7
पण आरोग्य तज्ज्ञ नेहमी नैसर्गिक पर्यायांना प्राधान्य देण्याचा सल्ला देतात. यामध्ये प्रामुख्याने नारळ पाणी आणि ताक हे दोन लोकप्रिय पर्याय समोर येतात. मात्र, तुमच्या शरीरासाठी काय अधिक फायदेशीर आहे, याबद्दल जाणून घेऊया.

2 / 7
नारळ पाणी हे नैसर्गिकरित्या शुद्ध आणि पोषक तत्वांनी समृद्ध असते. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडिअमचे प्रमाण अधिक असते, जे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात.

नारळ पाणी हे नैसर्गिकरित्या शुद्ध आणि पोषक तत्वांनी समृद्ध असते. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडिअमचे प्रमाण अधिक असते, जे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात.

3 / 7
जे लोक उन्हात जास्त फिरतात किंवा व्यायाम करतात, त्यांच्यासाठी नारळ पाणी इन्स्टंट एनर्जी देणारे पेय आहे. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि किडनीच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

जे लोक उन्हात जास्त फिरतात किंवा व्यायाम करतात, त्यांच्यासाठी नारळ पाणी इन्स्टंट एनर्जी देणारे पेय आहे. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि किडनीच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

4 / 7
भारतीय आहारशास्त्रात ताकाला पृथ्वीवरील अमृत मानले जाते. ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड आणि प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्थेला बळकट करतात.
ज्यांना उन्हाळ्यात ॲसिडिटी, पोट फुगणे किंवा पचनाच्या समस्या जाणवतात, त्यांच्यासाठी ताक हा सर्वोत्तम पर्याय आहे.

भारतीय आहारशास्त्रात ताकाला पृथ्वीवरील अमृत मानले जाते. ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड आणि प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्थेला बळकट करतात. ज्यांना उन्हाळ्यात ॲसिडिटी, पोट फुगणे किंवा पचनाच्या समस्या जाणवतात, त्यांच्यासाठी ताक हा सर्वोत्तम पर्याय आहे.

5 / 7
ताक प्यायल्याने शरीराचे तापमान लगेच कमी होते आणि जेवण पचण्यास मदत होते. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B12 देखील मुबलक प्रमाणात असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दोन्ही पेये आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. जर तुम्हाला तातडीने ऊर्जा आणि हायड्रेशन हवे असेल, तर नारळ पाणी निवडा.

6 / 7
पण जर तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर शरीराला थंडावा द्यायचा असेल आणि पचन सुधारायचे असेल, तर ताक घेणे जास्त हिताचे ठरते. शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी आणि दुपारी जेवणानंतर ताक घेणे हा एक संतुलित मार्ग असू शकतो.

7 / 7
Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...