AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांचा मोठा निर्णय, राजकीय घडामोडींना, पक्षांतर्गत..

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काही मोठे बदल करण्यात आले. पक्षांतर्गत हे बदल केले आहेत. शरद पवार यांनी मोठी भाकरी फिरवल्याचे सांगितले जातंय. त्यांनी थेट निर्णय घेतल्याचे दिसतंय.

शरद पवार यांचा मोठा निर्णय, राजकीय घडामोडींना, पक्षांतर्गत..
Sharad Pawar
| Updated on: Aug 03, 2026 | 6:50 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासंदर्भात मोठी बातमी पुढे येत आहे. शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला. पक्षात महत्वाचे फेरबदल करण्यात आलीत. युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यांना कार्यकाळ वाढून न देता थेट नव्या नियुक्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान एक शहरी तर एक ग्रामीण युवक अध्यक्ष नेमण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला. त्यानुसारच नावांची घोषणा करण्यात आली. युवक प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली. मनाली भिलारे शहरच्या युवती प्रदेशाध्यक्ष अमृता कालदाते ग्रामीणच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. शरद पवार यांनी या नियुक्तांदरम्यान मोठे बदल केल्याचे दिसत आहे. शहरी आणि ग्रामीण यानुसार, पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसत आहे. हेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचेही सांगितले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला स्वत: शरद पवार दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोहोचले होते. यादरम्यान सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.

नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे स्वागतही केले. या भेटीचे काही फोटो पुढे आले. मात्र, या भेटीमध्ये नक्की कोणत्या विषयात चर्चा झाली हे कळू शकले नाही. शरद पवार दिल्लीच्या आंदोलनाच्या मुद्द्यात नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्याचे  सांगितले जात होते. मात्र, या भेटीत नक्की चर्चा काय झाली ती माहिती पुढे येऊ शकली नाही.

शरद पवार एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले. त्यामध्येच आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनात पक्षात काही अत्यंत मोठे बदल करण्यात आले. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात शरद पवार यांनी स्वत: आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी काही वेळ आंदोलकांसोबत चर्चा केली. या आंदोलनाबद्दल सुप्रिया सुळेही भूमिका घेताना दिसल्या.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ