कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात गेली, ती पुन्हा कधीच परतली नाही, महिलेसोबत काय घडले?

| Updated on: May 19, 2023 | 9:25 PM

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिची तब्येत खालावली आणि ती पुन्हा घरी परतलीच नाही.

कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात गेली, ती पुन्हा कधीच परतली नाही, महिलेसोबत काय घडले?
पुण्यात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करताना महिलेचा मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

शिरुर : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टाकळी हाजी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कुंटुब नियोजन शस्त्रक्रिया करताना एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेखा हिलाल असं मृत महिलेचं नाव आहे. हिलाल यांची शस्रक्रिया करण्यापूर्वी फिटनेस सर्टफिकेट नव्हते. तसेच ब्लड प्रेशर हाय झाले असतानाही डॉक्टरांनी शस्रक्रिया करण्याची घाई केल्याने हिलाल यांचा मृत्यू झाला, असा आरोप पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोकळे यांनी केली आहे.

वैद्यकीय अधिकारी काय म्हणाल्या?

टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार,टाकळी हाजी केंद्रातील 42 तर कवठे केंद्रातील 38 अशा 80 महिला कुंटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. डॉ. शिवाजी गजरे यांनी या शस्त्रक्रिया केल्या. रेखा हिलाल ही कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रामधील असून, त्यांची सर्व प्रकारची तपासणी केल्यानंतर त्यांना ऑपरेशन टेबलवर घेतले. त्यांची तब्बेत एकदम ठणठणीत होती. मात्र शस्त्रक्रिया सुरु झाल्यानंतर त्या घाबरल्या. यामुळे त्यांना त्रास होऊ लागल्याने त्ंयाना खाली घेतले आणि पुढील उपचारासाठी शिरूरला पाठवले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

सरकारच्या आरोग्य सेवेबद्दल प्रश्नचिन्ह

रेखा हिलाल यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मृत्युमुळे आरोग्य खात्यांच्या सेवेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणने रेखा हिलाल या कवठे येमाई आरोग्य केंद्रामधील आहे. तेथील 38 महिलांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियोसाठी रुग्नवाहिकेने टाकळी हाजी येथे आणण्यात आले होते. मात्र कवठे येमाई येथील दोनपैकी एकही वैद्यकीय अधिकारी इकडे फिरकला सुद्धा नाही. सध्या तालुक्यात आरोग्य सेवा रामभरोसे असून, असे किती लोकांचे प्राण घेणार आहात, असा संप्तप्त सवाल नागरिकांनी केला आहे. अनेक वेळा रात्री महिला रुग्ण आल्यास सरकारी दवाखान्यात डॉक्टर नसल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात जावे लागते.

हे सुद्धा वाचा