Crime News : इमोशनल करुन इंडियन एअर फोर्सच्या महिला अधिकाऱ्याला त्याने जाळ्यात ओढलं आणि मग…..

इमोशनल ब्लॅकमेल करुन त्याने एकदा नाही, दोनदा फसवलं. एकदा विश्वासघात झाल्यानंतर दुसऱ्यांदा तुम्ही त्याच व्यक्तीवर कसा विश्वास ठेऊ शकता? महत्वाच म्हणजे फसवणूक झालेली महिला संरक्षण संस्थेत अधिकारी आहे.

Crime News : इमोशनल करुन इंडियन एअर फोर्सच्या महिला अधिकाऱ्याला त्याने जाळ्यात ओढलं आणि मग.....
love cheat
Image Credit source: Representative image
| Updated on: Jun 02, 2023 | 2:15 PM

लखनऊ : लंडन स्थित प्रॉपर्टी डिलर असल्याच भासवून इंडियन एअर फोर्सच्या एका महिला अधिकाऱ्याची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लखनऊ कॅन्टॉनमेंट येथे या महिला अधिकाऱ्याची पोस्टिंग होती. महिला अधिकऱ्याने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. महिलेच मॅट्रीमोनियल वेबसाइटवरुन वर संशोधन सुरु होतं. त्यावेळी तिची डॉ. अमित यादव बरोबर ओळख झाली. अमितने तो परदेशी राहत असल्याच दाखवलं.

लग्नानंतर भारतात स्थायिक होणार असल्याच त्याने आश्वासन दिलं होतं. भारतात जमीन खरेदी करायचीय असं सांगितलं. भावनिक दृष्ट्या ब्लॅकमेल करुन त्याने महिला अधिकाऱ्याकडून त्याच्या खात्यात पैसे डिपॉझिट करुन घेतले. महिलेने तिच्या तक्रारीत हे सर्व म्हटलय. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

किती लाख रुपये दिले?

आम्ही परस्परांशी बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याने भारतात जमीन खरेदी करणार असल्याच सांगितलं. “मी पैसे दिले नाहीत, तर स्वत:ला संपवून घेईल, अशी त्याने धमकी देण्यास सुरुवात केली. त्याने मला 23.5 लाख रुपये देण्यास भाग पाडले. पैसे खात्यात जमा झाल्यानंतर त्याने माझ्याशी बोलण बंद केलं” असं महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे.

पुन्हा केली फसवणूक

“त्याने मला जीवे मारण्याची तसच माझं करियर आणि आयुष्य उद्धवस्त करण्याची धमकी दिली. त्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याच बँक खात गोठवलं. त्याला या बद्दल समजल्यानंतर त्याने मला विनंती केली. खात पुन्हा सुरु झाल्यास, पैसे परत करता येतील, असं त्याने मला सांगितलं. मी संमती दिल्यानंतर त्याने पैसे काढून घेतले व अकाऊंट बंद केलं” असं महिलेने तिच्य़ा एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

दिल्लीत येऊनही भेटला नाही

पैसे खात्यात ट्रान्सफर केल्यानंतर आरोपी दिल्लीत आला होता. त्याचा मोबाइल नंबर चालू होता. मी लखनऊच्या सायबर सेलकडे आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली. आरोपी तिला एकदाही भेटला नाही व त्याने जी प्रॉपर्टी विकत घेतल्याच सांगितलं, त्याची कागदपत्र सुद्धा दिली नाहीत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.