AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नृत्यांगना दिपाली पाटील प्रकरणी मोठी अपडेट! थेट भाजप नेत्याला अटक

Dancer Deepali Patil: अहिल्यानगर येथील नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एका भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. आता हा नेता कोण आहे? नेमकं काय झालं? जाणून घेऊया...

नृत्यांगना दिपाली पाटील प्रकरणी मोठी अपडेट! थेट भाजप नेत्याला अटक
AhilyanagarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 06, 2025 | 5:09 PM
Share

अहिल्यानगरच्या जामखेड येथील कला केंद्रावर काम करणारी नृत्यांगना दिपाली पाटील हिने एका लॉजवर जाऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ माजली आहे. दिपाली ही मूळची कल्याणची आहे. तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी भाजपाच्या नेत्याला अटक केली आहे.

कुटुंबियांनी केली तक्रार

जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटीलने स्वत:ला संपवले. तिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत संदीप गायकवाड याची पत्नी लता संदीप गायकवाड यांनी भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी केली आहे. हे दोघेही पती-पत्नी माजी नगरसेवक आहेत.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

दिपाली पाटीलच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दीपाली पाटीलसा संदीप गायकवाड हा लग्नाचा तगादा लावत असल्यानेच तिने आत्महत्या केल्याचे आरोप नातेवाईकांनी फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

दिपाली पाटील ही काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली होती. परंतु अनेक तास उलटूनही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. दिपाली ज्या रिक्षाने गेली त्या रिक्षा चालकाची चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले. मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रूम आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलवला. आता या प्रकरणी भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे.

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.