AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत वाढली तर काय होतं? खिशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सर्वकाही

भारतीय चलन रूपया बुधवारी डॉलरच्या तुलनेत घसरला आणि त्याची इतिहासात नोंद झाली. कारण रुपया यापूर्वी कधीच 90 रुपयांच्या वर घसरला नव्हता. रुपयाची किंमत 89.94 रुपयांवरून 90.14 वर घसरला. खरं तर ही घसरण खूप कमी वाटत असली तरी तुमच्या खिशावर खूप मोठा परिणाम करणारी आहे.

रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत वाढली तर काय होतं? खिशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सर्वकाही
रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत वाढली तर काय होतं? खिशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सर्वकाहीImage Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Dec 06, 2025 | 5:09 PM
Share

आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता कायम डॉलर आणि रुपयाची तुलना केली जाते. कारण यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं मूल्य अधोरेखित होत असतं. गेल्या काही वर्षात रुपयाचं सातत्याने अवमूल्यन होत आहे. पण भारतीय रुपयाच्या इतिहासात पहिल्यांदाच रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 90 पेक्षा जास्त रुपयांनी घसरली. त्यामुळे भारतीय बाजारात खळबळ उडाली आहे. कारण त्याचे परिणाम भविष्यात काय होऊ शकतात याची जाणीव आहे. हा फक्त एक आकडा नाही तर येणाऱ्या काही महिन्यात तुमच्या खिशावर काय परिणाम होईल याचे संकेत देत आहे. भविष्यात एक डॉलरची किंमत 100च्या पार जाणार का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. रुपया आणि डॉलरची किंमत कशी ठरते? डॉलर आणि रुपयात इतका फरक का? सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे मिळतील.

डॉलर आणि रुपयात फरक कसा दिसून येतो?

डॉलर आणि रुपया महाग स्वस्त झाला हे कसं कळतं? त्याचं उदाहरण द्यायचं तर तुम्ही बाजारात गेलात आणि तुम्हाला कांदे घ्यायचे आहेत. पण बाजारात कांद्याची आवाक कमी आहे त्यामुळे तुम्हाला एका किलोला पूर्वीपेक्षा जास्त रुपये मोजावे लागतील. कारण मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. तसंच भारतीय बाजारात डॉलर कमी येत आहेत. त्यामुळे त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यासाठी बरीच कारणं आहेत.  पुढे तुम्हाला याबाबत समजून घेता येईल.

भारतात डॉलर्स कुठून येतात?

पहिलं तर  भारतात डॉलर्स हे निर्यातीच्या माध्यमातून येतात. वस्तू निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात तुम्हाला डॉलर्स मिळतात. दुसरं अमेरिकेत काम करणारे भारतीय देशात तिथे पैसे कमवून आपल्याकडे पाठवतात. तिसरं विदेशी पर्यटक भारतात येतात तेव्हा ते डॉलर घेऊन येतात आणि खर्च करतात. चौथं विदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करतात तेव्हा डॉलरच्या माध्यमातून करतात. पण सध्या चारही माध्यमं पाहिली तर निर्यात आणि गुंतवणूक हे सर्वात जास्त प्रभाव करत आहे. टॅरिफमुळे भारताच्या निर्यातीवर बंधनं आली आहेत. दुसरीकडे, भारतात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवर ट्रम्प सरकारने निर्बंध लादले आहेत. त्यांना भारतात गुंतवणून करण्याऐवजी अमेरिकेतच गुंतवणूक करण्यास भाग पाडलं जात आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणुकीत घट झाली आहे. ही दोन कारणं प्रामुख्याने प्रभावी ठरत आहेत.

डॉलरची किंमत का वाढत आहे?

अर्थतज्ज्ञाच्या मते, भारत विदेशातून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. आपण रशियाकडून तेल आयात करताना डॉलर्समध्ये किंमत मोजत नव्हतो. पण आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने रशियातून तेल आयातीत काही प्रमाणात घट करावी लागल्याचं बोललं जात आहे. आपल्याला गरज भागवण्यासाठी इतर देशांकडून कच्चे तेल आयात करावं लागत आहे. त्यासाठी आपल्याला डॉलर्समध्ये पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे बाजारात डॉलर्सची मागणी वाढली आहे. इतकंच काय तर अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी डॉलर्सची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जगात अनिश्चिततेचा वातावरण असल्याने सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. देशात येणाऱ्या सोन्यासाठी डॉलरमध्ये पेमेंट केलं जातं. याचा परिणाम रुपयावर झाला आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यात संबंध ताणले गेले आहेत. टॅरिफवर तोडगा काढण्यात अजूनही अपयश आलेलं आहे. भारतीय उत्पादनांवर अमेरिकेत 50 टक्के शुल्क लादलं गेलं आहे. त्यामुळे उद्योगपती आणि गुंतवणूकदारांचं चिंता वाढली आहे. त्याचा थेट परिणाम रुपयावर झाला आहे. दुसरीकडे, विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील 17 अब्ज डॉलर काढून घेतल्याने रुपयावर भार पडला आहे.

रुपयाची किंमत घसरल्याने काय होईल?

अर्थतज्ज्ञांच्या मते, भारत पेट्रोल आणि डिझेल आणि स्वयंपाकाच्या तेलापासून ते मोबाईल फोन, टेलिव्हिजन, यंत्रसामग्री आणि बरेच काही आयात करतो. रुपयाचं अवमूल्यन झाल्यास या वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल, गॅस, विमान तिकिटे, इलेक्ट्रॉनिक्स, आयात केलेली औषधे आणि वाहनांच्या किमतीत वाढ होईल. त्यामुळे सर्व सामन्यांच्या खिशावर भार पडणार हे दिसत आहे.

डॉलर आणि रुपयाची किंमत किती होती?

केंद्रीय बँकेच्या “आरबीआय द 1991 प्रोजेक्ट डेटा” या दस्तऐवजानुसार, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा एक डॉलर 3.30 रुपयांचा होता. 1966 मध्ये भारतीय चलनाचं मोठं अवमूल्यन झालं. भारत चीन आणि भारत पाकिस्तान युद्धाचा रुपयावर परिणाम झाला. त्यात 1965-66 मध्ये दुष्काळ पडला आणि उत्पादनात घट झाली. तसेच महागाई गगनाला भिडली. या काळात डॉलरच्या तुलनेत रुपया 4.76 वरून 7.50 पर्यंत घसरला. 1991 मध्ये देश आर्थिक संकटात सापडला. तेव्हा रूपयाची किंमत 21 वरून 26 पर्यंत घसरली. 1991 ते 2008 या काळात रूपया 39 रुपयांपर्यंत कमकुवत झाला. अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स बँकेच्या पतनामुळे जागतिक मंदी आली. डॉलरच्या तुलनेत रुपया 51 रुपयांपर्यंत घसरला. 2014 साली नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता येण्यापूर्वी डॉलरची किंमत 55 रूपयांवरून 68.80 रुपयांवर आली. मंदीच्या बातम्यांना घाबरून गुंतवणूकदारांनी पैसे काढल्याने हा फटका बसला होता.

या वर्षात रुपयाचं अवमूल्यन किती झालं?

2025 या वर्षात रुपयाची किंमत 5 टक्क्यांनी घसरली आहे. त्यामुळे या वर्षात सर्वात वाईट कामगिरी करणारं आशियाई चलन ठरलं आहे. जाणकारांच्या मते, भारत अमेरिका यांच्यातील करार झाल्यानंतर रुपयाची घसरण थांबू शकते. तसेच रुपयाचं वजनही वाढू शकते. पण भारतावर किती टॅरिफ लादला जातो यावर सर्वकाही अवलंबून आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.